निलयम संस्थेमार्फत रोटी डे साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे काल १ मार्च रोजी सेवा निलयम संस्थेमार्फत रोटी डे साजरा करण्यात आला. रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरातील गरजू लोकांना त्याप्रमाणे काही प्रवाश्यांना जेवण वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील ४ वर्षे संस्था करत आहे. उपक्रम सुरू करण्याचा उद्देश असा की, फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. तर भुकेल्या लोकांसाठी एखादा दिवस असावा, म्हणून ही संकल्पना सुरू केली. उपक्रमाचे हे ५ वे वर्ष होते. उपक्रमास ऐश्वर्या मुनीश्वर, राजकुंवर घाटगे, मयुरी उरसाल, दिपाली शिंदे, महेश उरसाल, सई उरसाल, राहुल गोंदिल, सुजीत साळोखे, सुहास खुडे, अमित देशपांडे, कृष्णात दांडगे, अमर पोवार, सुरज केसरकर, सौरभ कापडी उपस्थित होते.