अथायु हॉस्पिटलमध्ये छिद्राद्वारे हृदयाची मोठी शस्त्रक्रिया यशस्वी, बायपासला मिळाला सक्षम पर्याय
कोल्हापूर/प्रतिनिधी : उजळाईवाडी येथील आथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठी चिरफाड न करता (एमआयसीएस) कमीत कमी छिद्राद्वारे हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली गेली आहे अशी माहिती हॉस्पिटलचे हृदयरोग रोग तज्ञ डॉ. अमोल भोजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बायपास शस्त्रक्रियेला हे तंत्रज्ञान पर्याय असून मुंबई पुण्यानंतर कोल्हापुरातही मध्ये अशी शस्त्रक्रिया होत असल्याचे डॉ. भोजे यांनी यावेळी नमूद केले.ह्रदयाच्या ब्लॉकेजेससाठी स्टेंटपेक्षा बायपास शस्त्रक्रिया ही कधीही फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारी आहे. स्टेंटमुळे काही काळाने पुन्हा त्रास होतो यासाठी एन्जिओप्लास्टी व शस्त्रक्रियेचा एकत्रित लाभ रुग्णांना मिळण्यासाठी ‘एमआयसीएस’ ही प्रणाली प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले.बायपासवेळी मोठी चिरफाड करावी लागते यातून रुग्ण पूर्ववत होण्यास काही महिन्याचा कालावधी जातो. त्यासाठी ‘एमआयसीएस’ हे आधुनिक तंत्रज्ञान पुढे आले आहे देशात मोजक्याच शहरात हे तंत्रज्ञान उपलब्ध असून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर मधील अथायू हॉस्पिटलमध्ये याचा वापर करून तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे डॉ. भोजे यांनी यावेळी सांगितले. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही प्रणाली अधिक सुरक्षित आहे आतापर्यंत दिल्ली येथे ७० ते ८० रुग्णांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेमुळे तीन दिवसात रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी जातो असेही डॉ.भोजे यांनी सांगितले. यावेळी अथायू हॉस्पिटलचे चेअरमन अनंत सरनाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरव गांधी आदी उपस्थित होते.