कोरगावकर पेट्रोल पंप शिरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त प्रतिमा पूजन,छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सर्वांनी जगावे- अमोल कोरगावकर
कोल्हापूर/प्रतिनिधी : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोरगावकर पेट्रोल पंप शिरोली फाटा येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे कधी जाती-धर्माला थारा दिला नाही,त्याचे अनुकरण करत मुस्लीम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. पंपाचे मालक अमोल कोरगावकर,
यांनी “छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेऊन न नाचता शिवरायांचा विचार मनात ठेवून काम केल, त्यांच्यातील प्रत्येक गुण आत्मसात केला तर नक्किच जिवन सुखाचे होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण म्हणजे ते जाती-धर्माला थारा देत नसत,त्याचेच अनुकरण करत आज मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन शिवजयंती साजरी केली,”असल्याचे सांगितले.यावेळी आशिष कोरगावकर,आकाश कोरगावकर,अंजुम देसाई (दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),राज कोरगावकर,अन्सार देसाई (काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष)अनिकेत कोरगावकर, सलीम महात(ग्रामपंचायत सदस्य) मोहम्मद महात, अन्वर मुजावर,हाफिज अबूबकर मनेर, जनाब अब्दुल मजिद, मौलाना रियाज शेख, ईलाई शेख मुजीब देसाई वल्ली नायकवडी, जनाब आसिफ देसाई, नासिर जमादार, शाहरूख देसाई इमरान मुजावर, मन्नान शहा, मुल्ला सर, सलीम भाई, आशिष शिरेकर, सौरभ कुलकर्णी, तेजस सावंत, रजत जाधव,आदी उपस्थित होते.