खा.संजय मंडलिक यांची प्राचार्य व संस्था चालक यांच्या प्रलंबीत प्रश्नांसदर्भात
नाम. उदय सामंत यांचेशी सकारात्मक चर्चा
मुंबई/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य व संस्था चालक यांच्याशी निगडीत प्रलंबीत प्रश्नासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांनी नामदार उदय सामंत यांचेशी मंत्रालयामध्ये या प्रश्नांच्या सोडवणुकीकरीता आजरोजी सकारात्मकरित्या चर्चा केली असून यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांनी गेल्या महिन्यामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीनुसार ‘ मंत्रालय आपल्या दारी ‘ हा राज्यामध्ये अभिनव प्रकल्प सुरु केला व याची सुरवात शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर येथून केली. यावेळी एकाच दिवशी वेतन निश्चिती, अनुकंपा, रजा रोखीकरण, स्थान निश्चिती, ग्रॅज्युईटी आदी प्रलंबीत कामे नाम. उदय सामंत यांनी मार्गी लावले.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संस्था चालक व प्राचार्य संघटना यांच्या संदर्भातील काही विशेष प्रश्न फार वर्षापासून प्रलंबित होते व या प्रश्नांच्या सोडवणुकीकरीता खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या विनंतीनुसार आज रोजी मंत्रालयामध्ये नाम. उदय सामंत यांचे कक्षामध्ये बैठक बोलावण्यात आली असता या बैठकीस नाम. अदिती तटकरे व खासदार संजय मंडलिक यांचेसह आम. जयंत आसगावकर, डॉ प्रताप पाटील, पी. जी. शिंदे, प्रताप उर्फ भैय्या माने, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, चिमण डांगे, प्राचार्य डी आर मोरे, धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते तर, आमदार प्रकाश आबिटकर हे व्हिडीओ काँन्फरंन्सव्दारे या बैठकीमध्ये सामिल झाले होते. या बैठकीमध्ये यूजीसी ने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व मान. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या सुरवातीपासून प्राचार्यांचे मूळ वेतन रुपये 4
४३,००० /- पूर्वलक्षी प्रभावाने निश्चित करण्यास मंजूरी, प्राचार्यांची नियुक्ती
५ वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी करण्याचा निर्णय रद्द करुन पुर्वीप्रमाणेच प्राचार्यांची नियुक्ती त्यांच्या सेवानिवृत्ती वयापर्यंत संस्था चालकांच्या सहमतीने राहिल याबाबत शासन सकारात्मक, प्राचार्याची २६० पदे भरण्यास आदेश काढले असून उर्वरीत ३२५ रिक्त पदे लवकर भरण्याबाबत शासन स्तरावर मान्यता देत असल्याचे कळविले.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती बाबत वित्त विभागाकडे खास बाब म्हणून भरतीस परवानगी मागण्यासाठी माननीय वित्तमंत्री यांच्यासोबत सोबत बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले.सध्या बीसीए व एम.एस सी संगणक शास्त्र या अभ्यासक्रमांना फक्त एस सी व एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.एन टी, ओबीसी व खुल्या वर्गातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या दृष्टीने वित्त विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त समिती नेमून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी सादर केलेल्या काही संदर्भातील विषय हे अर्थ विभागाशी निगडीत असलेकारणाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नाम. अजित पवार यांची या शिष्टमंडळाने भेट घेऊन या विषयाच्या सोडवणुकीकरीता चर्चा केली या विषयावर पुंन्हा बैठक अधिवेशनानंतर लावत असल्याचे नामदार अजित पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले, ज्यामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक तरतुदी याबाबत विचार करण्यात येईल असे यावेळी आश्वासन दिले.