प्रकाशआण्णा आवाडे यांच्या अथक प्रयत्नामुळे इचलकरंजी येथे नाविन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर
कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या अथक प्रयत्नामुळे इचलकरंजी शहरामध्ये १०० शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतील पहिल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाचा शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते कष्टकरी कामगारवस्ती असलेल्या आसरानगर इचलकरंजी येथे करण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक विठ्ठल चोपडे, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, प्रकाश मोरे, बाळासाहेब पाटील, सचिन वरपे, अनिकेत चव्हाण, बिलाल पटवेगार, मित्तू सूर्यवंशी, रामा नाईक, रामा पाटील, जीवन कोळी, समाधान नेटके व भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.