महापालिका घरफाळा घोटाळ्याबाबत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे निवेदन सादर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागात शेकडो कोटींचा घरफाळा घोटाळा झालेला आहे याबाबत आम्ही गेले वर्षभर आपणाकडे या घोटाळयाची चौकशी करुन घोटाळा करणारे अधिकारी कर्मचारी आणि घरफाळा बुडवून सवलत घेणारे मिळकतधारक यांच्यावर कारवाई करुन घोटाळयाची रक्कम वसुल करावी
अशी मागणी करतोय पण या मागणीकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही आम्ही विचारणा केली तर समिती नेमली आहे, चौकशी चालू आहे इतकीच उत्तरे मिळतात काही प्रकरणात तर गुन्हा करणाऱ्यांनी कबुली दिली आहे. ते कारवाईस पात्र आहेत तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही अशी विचारणा करत आज पुन्हा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त नितीन देसाई यांना निवेदन देण्यात आले.भोगवटा धारक घरफळा बिले बंद आहेत ती त्वरित सुरु करतो त्याचबरोबर सदर निवेदनातील सर्व मुद्दे यांच्यावर चर्चा करुन मागणी प्रमाणे कारवाई करतो त्याचबरोबर २०२० ऑगस्ट हवाला मधील दोषी गुन्हेगारांव वर कारवाई बाबत चर्चा करतो असे आश्वासन दिले.
महापालिकेवर दरोडा घालणारे घरफाळयातील दरोडेखोर उजळमाथ्याने फिरत आहेत याच गोडबंगाल काय आहे ते कळत नाही. आज आम्ही आपणाकडे काही प्रश्न उपस्थित करतोय त्याचा जाहीर खुलासा आपण पंधरा दिवसात करावा अन्यथा आम्हाला आमची महापालिका
वाचविण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने जनआंदोलन करावे लागेल त्याच्या बऱ्या
वाईट घटनांची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घेऊन खालील मुद्यांचा जाहीर खुलासा करावा. २५४ कोटी रुपयांची थकबाकी जाहीर करणेत आली आहे ती कधीपासूनची आहे. गेल्या कित्येक वर्षात घरफाळा विभागाचे ऑडीट का झालेले नाही ? ऑडीट झाले असेल तर थकबाकीची गोष्ट का निदर्शनास आली नाही. या थकबाकीस कोण कोण अधिकारी जबाबदार आहेत, या कालावधीतील ऑडीटर कोण आहेत, त्यांची नांवे जाहीर करावीत,गेल्या कित्येक वर्षे खोटी रक्कम दर्शवून खोटे बजेट तयार केल गेलयं त्यामुळे शहरवासियांची फसवणुक केली गेली आहे. इतक्या मोठया थकबाकीमुळे विकासकामांना निधी अपूरा पडतोय त्यामुळे शहराचा नुकसान झालय या नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहात की यापूर्वीच्या घोटाळयातील दरोडेखोराना संरक्षण दिलय त्याप्रमाणे यानाही संरक्षण देणार आहात ?, २५४ कोटी रुपयांच्या थकबाकीदारांच्या यादीतील १० लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मिळकत धारकांची तसेच बडया मिळकत धारकांची यादी/तसेच १० ते १२ हजार मिळकतींची आकारणी शून्य करणेत आली आहे ती यादी व ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही शून्य करणेत आली आहे या सर्वांची यादी महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द करुन त्याचे शहराच्या
प्रमुख चौकात होडींग लावावेत, ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही शून्य आकारणी केली आहे त्यांची खातेनिहाय चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र वकील नेमणूक करावा,सध्याची घरफाळा आकारणी संगणक प्रणाली चुकीची बोगस आहे ती बंद करुन नविन संगणक प्रणाली अमंलात आणावी,सायबर टेक कंपनीला दिड कोटी रुपये आदा केलेत पण त्यांनी काम पूर्ण केलेले नाही, सॅटेलाईट सर्व्हे पूर्ण झालेला नाही त्यामुळे सदर कंपनीला टेंडर देणारे अधिकारी व संबंधित कंपनीवर फौजदारी दाखल करावी. व त्या
कंपनीस ब्लॅकलिसट यादीत समाविष्ट करावे.
गेली कित्येक वर्ष महापालिकेच्या वतीने भोगवटाधारक घरफाळा बिले वाटप बंद केले याची कारणे काय ? यामुळे थकीत असलेल्या रकमेला जबाबदार कोण ? महानगरपालिकेने घरफाळा धारकांना कम्प्लसरी आधार लिंक प्रक्रिया सुरु करावी. त्याचबरोबर आम्ही राज्याचे नगरविकासमंत्री नाम. एकनाथ शिंदेसाो
यांचेकडे या घरफाळा घोटयाळयाची एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्याची मागणी
केली होती त्यावर राज्य शासनाने आपल्या महापालिकेशी काही संपर्क केला आहे
काय ? या सर्व प्रश्नांचा आपण १५ दिवसात जनतेला जाहीर खुलासा करावा
अन्यथा आम्हाला महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्व नोटीस न देता आमची
महापालिका वाचविण्यासाठी जनआंदोलन करावे लागेल त्याची सर्व जबाबदारी
आपणावर राहील असा इशारा दिला आहे.
यावेळी शिष्टमंडळात अशोक पोवार,रमेश मोरे, भाऊ घोडके, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत पाटील, विनोद डुंणूग, राजू मालेकर, श्रीकांत भोसले, रणजित पवार आदींचा सहभाग होता.