Wednesday, September 11, 2024
Home ताज्या 'न्यु महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेत शासनाची फसवणूक

‘न्यु महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेत शासनाची फसवणूक

‘न्यु महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेत शासनाची फसवणूक

कोल्हापूर/प्रतिनिधी : साजनी, ता हातकणंगले येथे ‘न्यु महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्था नावाचे युनीट सन २००९ पासून सुरू होते. पुढे ते बंद पडले. शासनाकड्न ३ कोटी रुपयाहून जास्त अनुदान घेऊन हे युनीट सुरु झाले होते. नंतर ते बंद पडले. शासकीय लेखा परिक्षक देशमुख यांनी सन २०१० ते २०१८ या कालावधी मधे झालेल्या लेखा परिक्षणामधे शासनाची ३ कोटीहून अधिक फसवणूक झाल्याचे आढळल्यामुळे शासनाचे वतीने त्यांनी संस्थेचे चेअरमन तुळशीदास देसाई कांबळे, सचीव अरविंद मुरूडकर व संचालक कुमार आकाराम कांबळे यांचे विरूद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. आरोपी बरेच दिवस फरार होते. दरम्यान पोलीसांनी साजनी येथील बंद पडलेले २ कोटी रुपयाचे युनीटचा ताबा पंचनामा करून सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांचेकडे सूपुर्त केला. आरोपी पैकी संचालक कुमार आकाराम कांबळे यांने सेशन कोर्ट, इचलकरंजी येथे अटक पुर्व जामिनाकरीता अर्ज दाखल केला होता. न्या बावनकर यांनी तो नामंजूर केला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर पोहवा दिनेश ऊंडाळे हे आरोपीचे मागावर होते. सायबर विभागाची मदत घेऊन दोन दिवस इचलकरंजी, सांगली, मिरज भागात शोध मोहीम सुरू होती.आञ पहाटे जयसिंगपुर इचलकरंजी रोडवर आरोपी कुमार कांबळे यास त्यास शिताफीने पकडले. इचलकरंजी कोर्टात हजर केले असता त्यास दिनांक ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाले आहे.
अपर पोलीस अधिक्षक श्री तिरुपती काकडे, डीवायएसपी सौ.कदम यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments