कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर/प्रतिनिधी : विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न शिवसैनिकांनी साकार केले आहे. कोल्हापूर शहरावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठीचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली असून, “हीच ती वेळ शिवसेनेचा महापौर करण्याची” या घोषवाक्याद्वारे महापालिका निवडणुकीस सामोरे जाण्यास शिवसेना सज्ज असल्याचे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्यात शिवसेना सत्तेत असून, मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपली ताकत दाखवून दिली आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांचे संयमी आणि कुशल नेतृत्व महाराष्ट्र राज्याने मान्य केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेस पोषक वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. गेल्या महिन्याभरात नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि शिवसेनासंपर्क मंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम.मा.श्री.उदय सामंत यांच्या दौऱ्याने शिवसेना निवडणूक पूर्ण ताकतीने आणि शिवसेनेचा महापौर करण्याच्या इराद्यानेच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्या आदेशाने पक्षातील वरिष्ठ नेते, मंत्री महोदय या निवडणुकीत खासकरून सक्रीय होणार आहेत.
शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार असून, शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात दिवसभरात विविध बैठका, प्रलंबित प्रश्नांवर घेतलेली सकारात्मक भूमिका आणि निधीच्या घोषणा यामुळे एका अर्थाने महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वच पक्षांवर आघाडी घेतली आहे. कोल्हापूर शहराची मुख्य मागणी असलेल्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महानापालिका प्रशासनास दिल्या. थेट पाईपलाईन योजनेचे उर्वरित कामासाठी पाठपुरावा, शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासह ऑडीटेरियम, गारमेंट कॉलेज आदीबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. शाहू समाधीस्थळास रु.८ कोटींचा निधी, लेजर शो द्वारे ऐतिहासिक पन्हाळा गड उजळवून गडाचे सौंदर्य वाढविण्यासाठी रु.१२ कोटी निधीची मंजुरी,व मंजूर असलेल्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर रु.८० मधील रु.९ कोटी इतकीच रक्कम देण्यात आली आहेत. उर्वरित रु.७१ कोटी रुपये दोन टप्यात देण्यास मान्यता दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निर्माण चौक येथील जागेत प्रस्तावित नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची ग्वाही, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे गार्डन, नागाळा पार्क येथे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आणि बॉटॅनिकल गार्डन साठी रु. ५ कोटींचा निधी मान्यता दिली. ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी व सुशोभीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. कुस्ती परंपरा जपणाऱ्या शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृहास दुसऱ्या टप्प्यात निधी देण्याची ग्वाही दिली. कोल्हापूर महानगरपालिकेस टर्न टेबल लँडर खरेदी करण्यास निधीची ग्वाही, दुग्धव्यावसायिकांना एकाच ठिकाणी जनावरांच्या देखरेखीची आणि व्यवसाय करण्याकरिताचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आदी प्रश्नावर सकारात्मक निर्णय नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिले. ही निवडणुकीपुर्तीची आश्वासने नसून. त्यास मूर्त पूर्तता शिवसेना करणार आहे.
त्याचबरोबर शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी रु.१५ कोटींचा निधी देवून प्रभागातील प्रलंबित विकासकामांना गती दिली आहे. यासह गेल्या दहा वर्षात राजाराम बंधारा पूल, शहरात ५ ठिकाणी मल्टीस्पोर्ट्स ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरातील इतर स्मारकांचे सुशोभिकरण, अबालवृद्धांसाठी ठिकठिकाणी ओपन जिम, तालीम संस्था, मंडळे, समाज मंदिराना निधी देवून चौफेर विकासाचे काम शिवसेनेने केले आहे.
शिवसेना संपर्क मंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.मा.श्री.उदय सामंत यांच्या दौऱ्यातून शिवसेनेने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे आदी जो आदेश देतील त्या आदेशानुसार शिवसेना लढण्यास तयार आहे, त्याचबरोबर शिवसेना स्वबळावर लढण्यास देखील तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार नियोजनात्मक पद्धतीने, विकासाच्या जोरावर शिवसेनेचा महापौर करण्याचे ध्येय साध्य करू, असा विश्वासही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या समवेत शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, शिवसेना गटनेते राहुल चव्हाण, नगरसेवक नियाज खान, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह ठराविक प्रभागातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते, इच्छुक उमेदवारांना समोर आणून शिवसेनेने सर्वापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. यासह त्याभागातील इच्छुक उमेदवारांना विकासकामांकरिता निधी देवून पाठबळ देत. नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विकासकामांचे माध्यम अंमलात आणले आहे.
या पत्रकार परिषदेस देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, माजी परिवहन सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ.तेजस्विनी इंगवले, माजी नगरसेवक राजू हुंबे, सौ.स्नेहल राहुल चव्हाण, सौ.ज्योती निलेश हंकारे, माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, दीपक गौड, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अजित गायकवाड, अश्विन शेळके, रहीम बागवान, अभिषेक देवणे, अजित मोरे, सुहास सोरटे, रियाज बागवान, रणजीत मिणचेकर, योगेश ओटवकर आदी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार उपस्थित होते.