Sunday, January 19, 2025
Home महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश तर्फे शिवगान स्पर्धेचे आयोजन

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश तर्फे शिवगान स्पर्धेचे आयोजन

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश तर्फे शिवगान स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी :  भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “शिवगान” स्पर्धा २०२१ या गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. भाजपा कला व सांस्कृतिक आघाडीच्यावतीने कोल्हापूर मधील गायकांसाठी देखील ही स्पर्धा खुली करण्यात आली आहे.  सदर स्पर्धा१२ वर्षां पुढील गायकांसाठी खुली आहे. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये आयोजित केली आहे. सदर गायन स्पर्धा वैयक्तिक व सांघिक गीत प्रकारामध्ये असून या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि ९ फेब्रुवारी रोजीकोल्हापूरमध्ये व या स्पर्धेची अंतिम फेरी शिवजयंती दिवशी दि १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सातारा येथे अजिंक्यतारा गड येथे होईल. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. सदर स्पर्धेमध्ये गायक मराठी, हिंदी, संस्कृत भाषेमध्ये गीत सादर करू शकतात.
या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फुर्ती गीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी विषयांवरील गीत सादर करायचे आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरीची बक्षीसे पुढील प्रमाणे :
वैयक्तिक गीत गायन स्पर्धा –
प्रथम क्रमांक – ७०००/-  द्वितीय क्रमांक – ५०००/-  तृतीय क्रमांक – ३०००/-
सांघिक गीत गायन स्पर्धा
प्रथम क्रमांक – ११०००/-  द्वितीय क्रमांक – ७५००/-  तृतीय क्रमांक – ५१००/-
प्रत्येक विजेत्यास स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क- श्री. शैलेश जाधव (भाजपा कला व सांस्कृतिक आघाडी संयोजक) – ९३७३१४१२२३ यांच्याशी संपर्क साधावा.या स्पर्धेसाठी सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय, बिंदू चौक, कोल्हापूर येथे (सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत) दि ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत करावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments