सामाजिक कार्यकर्तै विश्वासाठी आरोग्य दिनदर्शिका अंत्यत मोलाची – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल माळी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय स्वयंसेवी कार्पौरेट आरोग्य विश्वाचे प्रतिबिंब असणारी शायरन फिचर्सची आरोग्य दिनदर्शिका ही सामाजिक – वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाला अत्यंत अत्यंत मोलाची अशीच आहे, भविष्यात त्याची व्याप्ती वाढवावी अशा शब्दात आपल्या शुभेच्छा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी दिल्या. यांच्या हस्ते सलग नवव्या वर्षी निघालेल्या शायरन फीचर्स – पी.आर.- हेल्थ इव्हेंटस्च्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन करण्यात आले सीपीआर आवारात झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात आरपीआयचे बाळासो बेलेकर त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . प्रारंभी सर्वांचे स्वागत संपादक समन्वयक राजेंद्र मकोटे यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच कर्नाटक श्री आरोग्य योजना यामध्ये सहभागी दवाखाने , ब्लड बँका,रुग्णवाहिका, लॅब, रुग्ण सेवेतील एनजीओ संस्थातसेच सर्पमित्र , आरोग्य स्वंयसेवक त्यांचा संपर्क आणि मोबाईल नंबर आहेत. यासह ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते – निवृत्त बँक अधिकारी सुहास जावडेकर,संकल्प थेरेपीचे डाँ,पी.एन.कदम , महाराष्ट्र शासन मुख्य प्रशासकीय आधिकारी आरोग्य अधिकारी भावना चौधरी, डॉक्टर संदेश कचरे , अँड.विनय कदम, डिटीओ डॉ. ऊषादेवी कुंभार आदि अभ्यासक अधिकारी वर्गौचे “कोरोना संदर्भ आणि बदलती जीवनशैली “यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन करणारे लेख आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन अमोल कुरणे यांनी केले. या वेळी डँप्क्यु च्या दीपा शिपूरकर, डी टी सी चे अभिजीत वायचळ- एकनाथ पाटील आरोग्य सेवक बंटी सावंत ,तुषार भिवटे, थॅलेसेमिया असोसिएशनचे बरकत पन्हाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सदर दिनदर्शिका गंगावेश येथे रणजित आयरेकर, पिरवाडी व नाळे काँलनीयेथील सावली केअर सेंटर , नातू पेपर सेंटर, गुजरी काँर्नर , महाद्वार रोड , सावेकर पेपर स्टाँल राजारामपुरी या ठिकाणी स्वागत मुल्य देवून उपलब्ध असून या रकमेतून अंध विधार्थी वर्गौस बोलणारी घड्याळे दिली जाणार आहेत.