कुख्यात गुंड पपला गुर्जरला कोल्हापूरात मोठ्या शिताफीने अटक
कोल्हापूर प्रतिनिधी : राजस्थानसह तीन राज्यात मोस्ट वाॅंटेड असलेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जरला कोल्हापूरात मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. राजस्थानच्या कमांडो पथकाने अत्यंत धाडसाने पपलाला अटक केले. अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी हे मिशन फत्ते केले. राजस्थानमधील जेल फोडून पसार झालेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जरवर पाच लाख इनाम ठेवले होते. राजस्थान पोलिसांनी कोल्हापूरातील सरनोबतवाडी नजीक त्याच्या राहत्या घरी अटकेची ही कारवाई केली.गेल्या नऊ महिन्यापासून सरनोबत वाडी येथे राहत होता. राजस्थानमधील पोलीस ठाण्यातून पळून आलेला आणि गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात गुंड पपला गुर्जर याला अखेर कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांनी मोठ्या शिताफीने पपला गुर्जर याला अटक केली असून कोल्हापूर पोलिसांची सुद्धा या कारवाईमध्ये मोठी मदत झाली आहे. दरम्यान, राजस्थान पोलीस मोठ्या तयारीने कोल्हापूरात आले होते. शिवाय सर्वजण सतर्क होते, असेही कोल्हापूर पोलिसांनी म्हंटले आहे
संपूर्ण भारतातील पोलीस त्याच्या शोधात होते. त्या पपलाला राजस्थान पोलिसांनी सरनोबतवाडीमधून २८ जानेवारी रोजी मध्यरात्री पपला व त्याच्या मैत्रीणीलासुद्धा पोलिसांना अटक केली आहे. जिया शिकालगार असे या तरुणीचे नाव असून ती सातारा जिल्ह्यातील असल्याचेही समोर आले आहे. एका जिममध्ये जिया आणि पपला याची ओळख झाल्याची माहिती मिळाली असून गेल्या महिनाभरापासून जिया कोल्हापूरात येत होती, अशी माहिती सुद्धा सारनोबतवाडी येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.ईआरटी कमांडोची सुद्धा राजस्थान पोलिसांनी या कारवाईत मदत घेतली आहे.
पपला हा कोल्हापूरात आश्रय घेऊन असल्याबाबतची राजस्थान पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेऊन त्याला पकडण्याची तयारी सुरू केली होती. यावेळी पपला ज्या सारनोबतवाडी येथील उजळाई कॉलनीमध्ये राहायला भाड्याने रहायला होता. त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. शिवाय हा संपूर्ण परिसर पोलिसांनी चारही बाजूंनी घेरला होता.घरमलकाने आपल्या घरामध्ये भाडेकरु घ्यायचे असतील, तर त्या भाडेकरूंची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. संबंधित भाडेकरू काय करतो, तो कुठून आला, याबाबत पडताळणी केल्याशिवाय त्यांना भाड्याने घर देऊ नये. परराज्यातील किंव्हा इतर जिल्ह्यातील गुन्हेगार आश्रय घेण्यासाठी अशाप्रकारे भाड्यानेच राहत असतात. त्यामुळे संबंधित घर मालकाने चौकशी केल्याशिवाय घर भाड्याने देऊ नये. शिवाय एखाद्या भाडेकरूवर संशय आल्यास याबाबत जवळच्या पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन सुद्धा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.