कोल्हापुरात आर्ट फाउंडेशनच्यातर्फे बाल चित्रकारांचे चित्र प्रदर्शनाचे उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरात आर्ट फाउंडेशनच्यातर्फे बालिका दिनानिमित्त आयोजित बाल चित्रकारांचे चित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.कोल्हापूर ही कलानगरी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूरची हीच कला संस्कृती व परंपरा जपण्यासाठी आणि ही कला कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर, जगभर पोहचावी याचसाठी कोल्हापूर आर्ट फाउंडेशनची स्थापना केली होती.
लॉकडाउनच्या काळामध्ये शाळा बंदच्या सुट्टीत कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलचे विद्यार्थी कुमारी स्नेहा नागेश हंकारे (इयत्ता आठवी) व तिचा भाऊ सोहन हंकारे (इयत्ता तिसरी) या भावंडांचे निसर्गचित्राच्या प्रदर्शनाचे उदघाटन करताना आनंद पण झाला आणि समाधान ही होतं. कलानगरीची कलेची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी या लहानग्यांचे हात तयार होत आहेत. या चिमुकल्यांनी काढलेली ही निसर्गचित्र अत्यंत मनमोहक व सुंदर होती. न राहवून या चित्रांमधील एक निसर्गचित्र मी विकत घेतलं आणि आता ते मी मंत्रालयातील माझ्या कार्यालयामध्ये लावणार आहे. आपण सर्वांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन या चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे.यावेळी, कलादिग्दर्शक चंद्रकांत जोशी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राचार्य अजय दळवी, प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, मुख्याध्यापक माधव गोरे, वसंतराव मुळीक, प्रवीण केसरकर, राहुल बुधले, डॉक्टर मिलिंद सामानगडकर, दादा लाड, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सुरू झाले असून
ते ३० जानेवारी पर्यंत सकाळी, १० ते रात्री ८ पर्यंत शाहू स्मारक भवन आर्ट गॅलरी, दसरा चौक येथे सुरू राहणार आहे.