Saturday, November 30, 2024
Home ताज्या जगातील पहिल्या : स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण,आज गाडी बाजारात...

जगातील पहिल्या : स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण,आज गाडी बाजारात दाखल

जगातील पहिल्या : स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण,आज गाडी बाजारात दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगातील पहिल्या स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण झाले असून ही गाडी आज बाजारात दाखल झाली.रेनो’कडून अनोख्या कल्पकतेवर भर देण्यात आला असून बी-एसयुव्ही सेगमेंटमधील गतिमानतेची व्याख्या यामुळे पूर्णपणे बदलणार आहे. ही गाडी प्रथम भारतीय बाजारांत दाखल होणार आहे आणि त्यानंतर अन्य बाजारांत दाखल होणार आहे.या गाडीमधील स्मार्ट केबिनमध्ये आहे तंत्रज्ञान, कार्यशीलता आणि भरपूर जागा, सीएमएफए + मंचावर रेनो काइगर घेऊन आली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उत्पादन, या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा प्रशस्त जागा, केबिन स्टोरेज आणि कार्गोची सुविधा, जे ठरेल ट्रायबरच्या यशाचे सूत्र आहे. नव्या-कोऱ्या टर्बो पेट्रोल इंजिनसोबत रेनो काइगर उपलब्ध, कामगिरी आणि इंधन कार्यक्षमता देते
बऱ्याच काळापासून ग्रुप रेनोकडून त्यांच्या बहुप्रतीक्षित रेनो काइगरने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. रेनोने ही उत्सुकता आणखी ताणत त्यांच्या रेनो काइगरचे ग्लोबल प्रीमिअर आज भारतात दाखल केले. या नवीकोऱ्या आटोपशीर एसयुव्हीचे डिझाईन आणि निर्मिती भारतातच करण्यात आली असून तिचे आंतरराष्ट्रीय अनावरण करण्यापूर्वी रेनोकडून क्रांतिकारी उत्पादनांच्या फळीत नवीन रेनो काइगर भारतात लॉन्च केली. डस्टर, क्विड आणि ट्रायबरप्रमाणे रेनो काइगर देखील या सेगमेंटमधील गतिमानतेची व्याख्या बदलणार आहे. रेनोकडून आणखी एक गेमचेंजरचे वचन राखण्यात काइगर नक्कीच यशस्वी होणार आहे.
आमची नाविन्यपूर्ण कार्समधील सर्जनशीलता आणि ग्राहकांच्या गरजांचे सखोल ज्ञान अशा रेनोकडील सर्वोत्तम गोष्टींचा मेळ घालून काइगरची निर्मिती करण्यात आली आहे. रेनो ही खरोखरच गेम चेंजर असल्याचा हा एक ठोस पुरावाच आहे.”असे सेल्स आणि ऑपरेशन्स रेनो ब्रँडचे एसव्हीपी फब्रीस कँबोलीव्ह यांनी सांगितले आहे.
ग्रुप रेनोचे हेड ऑफ डिझाईन ईव्हीपी लॉरेन्स वान देन अॅकर यांनी याबाबत बोलताना म्हंटले आहे की “शो-कारचे वचन दिल्याप्रमाणे रेनो काइगर ही खरोखरच मजबूत, गतिशील आणि आरामदायी एसयुव्ही आहे. शहरी गडबड-गोंधळात प्रवास करण्यासाठी सुसज्ज असणाऱ्या या रेनो काइगरची रचना आम्ही लांबच्या प्रवासाच्या आणि कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांतून वाट काढण्याच्या दृष्टीनेच केली आहे. काइगर ही स्वत:चे वेगळेपण दाखवणारी एसयुव्ही आहे आणि तिच्या लांबलचक व्हीलबेसमुळे आतमध्ये मोकळी प्रशस्त जागा मिळते. या एसयुव्हीच्या ‘स्मार्ट केबिन’ची रचना आरामदायी आणि शेअरिंगला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने करण्यात आली आहे.”
रेनो काइगर ही भारताच्या डिझाईन, अभियांत्रिकी आणि निर्मिती क्षमतांचे प्रदर्शन करतानाच ‘मेक इन इंडिया’ मोहिमेबाबतच्या रेनोच्या ठोस वचनबद्धतेला अधोरेखित करेल. रेनो समुहाने भारतात नेहमीच प्रथा मोडण्यावर आणि नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यातून आपल्या उत्पादनांचा दर्जा विस्तृतपणे सिद्ध केला आहे. संपूर्ण नव्या रेनो काइगरच्या बाजारात येण्याने रेनो पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून देईल.रेनो काइगर आणि भारतीय बाजाराच्या महत्त्वाबाबत आपले मत व्यक्त करताना रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, “रेनोने भारतातील आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे आणि मॅक्रो-इकोनॉमिक वातावरणाला आव्हान देऊन उद्योगाचा ट्रेंड सुधारला आहे. आमच्या ठोस व्यवसाय धोरणाच्या माध्यमातून आम्ही हे साधले आहे आणि यात आकर्षक उत्पादन श्रेणी, दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण आणि ग्राहक केंद्रित उत्पादन तसेच आमचे देशभरात पसरलेले नेटवर्क यांचा मोलाचा वाटा आहे. आमच्या संपूर्णपणे नव्या असलेल्या रेनो काइगरच्या माध्यमातून आम्ही आज आणखी एक पाऊल उचलले आहे. ही एक उत्कंठावर्धक स्पोर्टी, सुपर स्मार्ट आणि आकर्षक अशी बी-एसयुव्ही आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील जास्त लोकांना एसयुव्हीचा पर्याय खुला करून देणाऱ्या डस्टरप्रमाणेच रेनो काइगर एसयुव्ही ही देखील पुन्हा एकदा अगदी नव्या ग्राहकांना भुरळ घालेल. या नव्या गेम-चेंजरमुळे आमचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments