कपूर कॉलनी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांकरिता भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कपूर कॉलनी, कदमवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि सर्व महिलांना एकत्र येऊन एक दिवस आनंदी वातावरणाचा उपयोग घ्यावा या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तानाजी आयवाळे यांनी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला, या स्पर्धेकरीता एकूण ४० स्पर्धक आले होते.
या स्पर्धेमध्ये एकूण सात बक्षीस देण्यात आली प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक पंचम क्रमांक व दोन विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.या स्पर्धेचे प्राविण्य द्वितीय क्रमांक विजेत्या मुलीचे ठरले ही मुलगी मोहिनी महादेव कांबळे वय वर्षे १७ इयत्ता अकरावी मध्ये शिकत आहे सर्वात महत्वाची बाबा म्हणजे ह्या मुलीला कानाने ऐकता येत नाही बोलता येत नाही व आणि विशेष म्हणजे व्यवसाइक स्पर्धेमध्ये तिने या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.
सर्व स्पर्धक महिलांनी पूर्ण दिवसभर आनंदात वेळ घालवला.स्पर्धेच्या आयोजक श्रीमती माधवी तानाजी आयवाळे, सौ नयना प्रमोद आयवळे, सौ माया संतोष आयवाळे यांनी या स्पर्धा इथून पुढे प्रत्येक प्रजासत्ताक दिनादिवशी होतील असे घोषित केले.