१००० चौ. स्क्वे. फुटपर्यतच्या व वरील अनिवासी वापरातील मिळकतींना थकबाकीवरील दंडव्याजावर फेब्रुवारी वमार्चमध्ये सवलत
कोल्हापूर/प्रतिनिधी : १००० चौ. स्क्वे. फुट पर्यतच्या व वरील अनिवासी वापरातील मिळकतींना चालू वर्षाच्या कराच्या मागणीसह थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणा केल्यास चालु मागणीसह थकबाकीवरील दंडव्याजावर फेब्रुवारी व मार्चमध्ये सवलत देण्यात येणार आहे. .घरफाळा दंड व्याजावरील सवलतीबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून या महिन्यापासून निवासी वापरातील मिळकतींवर त्याची अमंलबजावणी केली जाणार आहे. तर फेब्रुवारी व मार्चमध्ये १००० चौ. स्क्वे. फुट पर्यतच्या व वरील अनिवासी वापरातील मिळकतींना सवलत दिली जाणार आहे. यापुर्वी महापालिकेने १ हजार स्केअर फूटाच्या आतील मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये ३१ जानेवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ७० टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ६० टक्के व ३१ मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. १ हजार स्केअर फूटाच्या वरील मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये ३१ जानेवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ५० टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ४० टक्के व ३१ मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ३० टक्के सवलत दिली जाणार असलेचे जाहिर केले होते. यावेळी व्यापारी मिळकतीबाबत पुढील काही दिवसात निर्णय घेत असलेचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे १००० चौ. स्क्वे. फुट पर्यतच्या अनिवासी वापरातील मिळकतींना २८ फेब्रुवारी पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ५० टक्के व ३१ मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. १००० चौ. स्क्वे. फुटावरील अनिवासी वापरातील मिळकतींना २८ फेब्रुवारी पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात ४० टक्के व ३१ मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना दंड व्याजावरील माफी ही येथून पुढे दिली जाणार नाही यावर्षी ही शेवटची संधी असलेचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
सदरची सवलत योजनेचा दिनांक २६ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे. हि सवलत योजना जाहीर केले तारखेपासून अंतीम तारखेपर्यत थकबाकीदाराने त्याची मूळ थकबाकी व नोटीस, वॉरटं इत्यादीसह एक रक्कमी रोखीने भरलेस सवलत देण्यात येणार आहे. ज्या मिळकत धारकांची मिळकत थकबाकीपोटी सिल करणेत आली आहे अशा मिळकत धारकांना सुद्धा या योजनेत लाभ/ सूट देण्यात येईल. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीत कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घेतले पाहिजे. जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षणासाठी आवेदन, संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर योजने अंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील. सदर योजना ही वर नमूद केलेल्या कालावधीत जमा केलेल्या रक्कमांनाच लागू राहील. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना लागू राहणार नाही. योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी या योजणे अंतर्गत दावा करता येणार नाही. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे