राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची पारगड रोडवर कारवाई ३ लाख ३०हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर श्री वाय. एम. पवार अधीक्षक श्रीमती संध्याराणी देशमुख यांच्या सूचनेनुसार व बापूसो चौगुले उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक कोल्हापूर यांच्या पथकाने आज सोमवारी २५ जानेवारी रोजी वाघोत्रे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे अवैधरित्या गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीचा गुन्हा नोंद केला असून त्यात त्याची अधिक माहिती अशी आहे दि.२४ जानेवारी २०२१ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कोल्हापूर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की चंदगड तालुक्यातील पारगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडलेल्या चोरट्या मार्गाने काही इसम अवैधरित्या गोवा राज्यात तयार झालेले व महाराष्ट्र राज्यात परवानगी नसलेले विदेशी मद्याचे अवैधरित्या वाहतूक करणार आहेत या प्राप्त माहितीनुसार भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच या मार्गावर गोपनीय रित्या पाळत ठेवली होती त्यानुसार आज २५ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या वर्णनानुसार पारगड कडून येत असलेल्या एका मारुती अल्टो कार क्रमांक एम एच ०६ डब्ल्यू ३००६ या कारला तपासणी कामी वाघोत्रे तालुका चंदगड येथे थांबून वाहनांची तपासणी केली असता या वाहनांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्य भरलेले विविध ब्रँडचे ७५० व १८० मिली क्षमतेचे एकूण ३३ बॉक्स मिळून आले यावेळी वाहनात उमेश गोविंद आवढन राहणार तुडये तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हा इसम मिळून आला त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यात १ लाख ७५ हजार दोनशे इतक्या किमतीचे अवैध विदेशी मद्य व वाहनासह एकूण जप्त मुद्दे मालाची किंमत ही ३ लाख ३० हजार २०० रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक श्री संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील व किशोर नडे तसेच जवान सर्वश्री मारुती पवार,सचिन काळेल,संदीप जानकर, सागर शिंदे व जय शिनगारे यांनी केली आहे भरारी पथक या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.