भाजपा जिल्हा कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. भाजपा कोल्हापूरचे प्रभारी, माजी खासदार श्री अमर साबळे व भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली.
“तुम मुझे खून दो…मै तुम्हे आझादी दुंगा” या घोषणेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य नेताजींनी केले. अशा या महान देशभक्ता बद्दल केंद्र सरकारच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यावर्षीपासून ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असून ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे माजी खासदार श्री अमर साबळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, को.म.न.पा भाजपा माजी गटनेते अजित ठाणेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हर्डीकर, दीपक काटकर, प्रदीप उलपे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, डॉ.राजवर्धन, विवेक कुलकर्णी, प्रग्नेश हमलाई, संतोष माळी, अभिजित शिंदे, संजय जासूद, सुशांत पाटील, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, गणेश चिले, आसावरी जुगदार, संदीप कुंभार, अरविंद वडगांवकर, मंगला निपाणीकर, शौलेश जाधव, विवेक वोरा, गिरीष साळोखे, दिलीप बोंद्रे, अमर साठे, अनिल कामत, प्रसाद नरुले, विठ्ठल पाटील, पृथ्वीराज जाधव आदींसह भाजपा पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.