Wednesday, September 11, 2024
Home ताज्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी गावाचा विकास आणि नागरिकांची सेवा हेच एकमेव...

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी गावाचा विकास आणि नागरिकांची सेवा हेच एकमेव उद्धिष्ठ डोळ्यासमोर ठेवावे – पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी गावाचा विकास आणि नागरिकांची सेवा हेच एकमेव उद्धिष्ठ डोळ्यासमोर ठेवावे – पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुक ही राजकारणाची पहिली पायरी आहे या निवडणूकीत लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिले आहे. या विश्वासास पात्र राहून निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांनी गावाचा विकास आणि नागरिकांची सेवा हेच एकमेव उद्धिष्ठ डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे आवाहन कोल्हापूर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क येथे या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे लक्षणीय सदस्य विजयी झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काँग्रेसने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते आमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, ऋतूराज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.
याप्रसंगी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी नूतन सदस्यांचे अभिनंदन करत, विजयी झालेल्या सदस्यांनी लोकशाहीने दिलेली जबाबदारी पाददर्शकपणे सांभाळावी असे सांगितले. गावाचा विकास करण्याची तुमच्यात धमक असल्यानेच लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून निवडून दिले आहे त्यामुळे पुढील पाच वर्षात गावाचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचे नियोजन आत्तापासूनच करावे असे सांगितले.ज्या भागातून आपण निवडून आलात त्या ठिकाणच्या नागरिकांशी आदराने वागत त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्याचा पालकमंत्री आणि काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्या गावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक फार महत्वाची व अवघड असते. पंचायत राजमध्ये महत्वाची मानली जाणारी हि निवडणूक जिंकत सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हा सर्वांची जबाबदारी वाढल्याचे आमदार ऋतूराज पाटील यांनी सांगितले. तर आमदार चंद्रकांत जाधव, राजू आवळे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नविन सदस्यांनी शासनाच्या सर्व प्रकारच्या लोकाभिमुख योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा असे सांगत सर्वांचे अभिनंदन केले. विजयी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून कॉग्रेस पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यत पोहचवण्याबरोबरच पक्षवाढीसाठी नेहमी कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, तालुका अध्यक्ष, यांच्यासह काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments