केआयटी बायोटेकच्या ४० विद्यार्थ्यांची नामांकित इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप साठी निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : केआयटीच्या बायोटेक विभागातील ८ व्या सत्रातील ४० विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा बायोटेक इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिप साठी निवड झालेली आहे.NCML,मुंबई, स्ट्रिंग बायो, बंगळुरू, एन्झीन बायो सायन्स पुणे, सर्वोसिद्धी बायोटेक पुणे,जिनोवा बायो फार्मा पुणे,जीन्स स्पेक्ट्रम लाइफ सायन्स पुणे , एमबायो लिमिटेड महाड, क्यू बिडी पर्पल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे, म्याप्रो,वाई ,माहू वाईन्स मिडरी एल एल पी, नाशिक या नामवंत कंपन्यांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवसायिक रिसर्च संदर्भातील ट्रेनिंग या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ज्याचा उपयोग त्यांना त्यांच्या पुढील करिअर मध्ये निश्चित होईल असा विश्वास विभाग प्रमुख डॉ.पल्लवी पाटील यांनी व्यक्त केला आहे या सर्व ट्रेनिंग च्या निश्चितीसाठी विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.ऋतुपर्ण करकरे,ट्रेनिंग प्रमुख प्रा.ऐश्वर्या पिष्टे-देशमुख व बायोटेक्नॉलॉजी विभागातील सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न केले. केआयटी चे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही व्ही कार्जिंनी, रजिस्ट्रार डॉ. एम एम मुजुमदार यांचे प्रोत्साहन लाभले आहे.