डॉ.श्रीधर सावंत विद्यामंदिर तक्रारीबाबत बदल दहा दिवसात अहवाल द्यावा
नामदार बच्चू कडू
मुंबई/प्रतिनिधी : जयभारत शिक्षण संस्थेच्या डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाच्या तक्रारीबाबत दहा दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी दिले. आज मंत्रालयात आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली संस्था प्रतिनिधी ,शैक्षणिक अधिकारी शिक्षक संघटना प्रतिनिधी आणि डॉ.श्रीधर सावंत शाळेतील अन्यायग्रस्त शिक्षक यांच्या सोबत बैठक पार पडली. अन्यायग्रस्त शिक्षकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा नामदार बच्चू कडू यांच्या समोर मांडला. या वेळी जर संस्था वाचवायचे असेल तर आपण चुका मान्य कराव्यात अन्यथा आपल्यावर फौजदारी करण्या बरोबरच शाळेवर प्रशासन नेमण्याची कारवाई करण्याचा कडक इशारा ना . बच्चू कडू यांनी संस्था चालक जाधव यांना दिला.
शाळेचे मुख्याध्यापक एस एम पाटील व महिला शिक्षिका यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला व आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल सांगताना अश्रू अनावर झाले . नामदार बच्चू कडू यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत दहा दिवसात तातडीने अहवाल देण्याचे आदेश प्रशासन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिले. आज प्रशासकीय भावनांमध्ये संस्था मुख्याध्यापक व शिक्षक आणि संघटना प्रतिनिधी यांची बैठक आमदार बच्चू कडू यांच्या समोर झाली यावेळी विशेष कार्य अधिकारी विजय बोरसे कक्ष अधिकारी रा.वि. कुंडले सतलिंग स्वामी , शिक्षण निरीक्षक डी.एस. पोवार, मनपा प्रशासन अधिकारी शंकरराव यादव,शिक्षण विस्ताराधिकारी (प्राथ ) जे. टी पाटील, वेतन पथक अधीक्षक किशोरी करमुसे , जयराज कोळी, भरत रसाळे,संतोष आयरे, सुधाकर सावंत राजेंद्र कोरे , महादेव डावरे ,अमित परीट ,संजय पाटील हे उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच संस्था या संस्थेच्या शाळा या उदात्त हेतूने चालविल्या पाहिजेत व्यक्तिगत फायद्यासाठी नवे शिक्षक आणि संस्था यांनी समन्वयातून एकमेकांचा सन्मान ठेवून शाळा वाढवल्या पाहिजेत पण या शाळेत तक्रारीचा पाढा मोठा आहे त्यामुळे या शाळेच्या आर्थिक गैरव्यवहार व मानसिक खच्चीकरण शिक्षकांना गुलामगिरीची वागणूक याबद्दलचा पाडा मुख्याध्यापक एस एम पाटील यांनी मांडला .महिला शिक्षिका आणि आपल्यावर झालेले अन्य कथन करताना त्यांना अश्रू अनावर झाले कोल्हापुरातील सर्व संघटनांच्या कोल्हापूर शहर नागरी व कृती समितीच्या बैठकीमध्ये आपली चूक झाली माफी मागतो असे म्हणणारे संस्थाचालक परशराम जाधव हे या चौकशीच्या वेळी मात्र उलटले . अशा या वृत्ती विरोधात लढण्यासाठी संघटनेला दोषारोप करण्याचे काम त्यांनी केलं यामुळे नामदार बच्चू कडू यांनी हस्तक्षेप करून जर चुकीचा काही घडत असेल तर फौजदारी सुद्धा करावी लागेल किंवा शाळेवर प्रशासक नेमावा लागेल अशा प्रकारचा इशारा दिला. आणि दहा दिवसात कोणताही दबाव न घेता चौकशी अहवाल देण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. यावेळी मुख्याध्यापक एस् एम पाटील, पी एस घाटगे, किरण खटावकर राजाराम बी एल पाटील पि के कांबळे पाटील सुरेश शेळके भाग्यश्री पाटील, अमिता ढोबळे उज्वला बुनांद्रे फरिदा खतीब शिक्षक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.