बोंद्रेनगर झोपडपट्टीवासीयांना घरांसाठी मंत्रालयात गृहनिर्माण विभागाची बैठक संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : बोंद्रेनगर झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मंत्रालयात गृहनिर्माण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.बोंद्रेनगर झोपडपट्टी या शासकीय जागेवर असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. सदर झोपडपट्टी ही ‘सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थीद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यापैकी ७७ पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण विभाग व महानगरपालिका यांनी लवकर कार्यवाही करावी व महानगरपालिकेने सत्वर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना दिले आहे. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही.आर. श्रीनिवास, कोल्हापूर महानगरपालिकेचे युवराज जबडे, शेल्टर असोसिएटस्, माजी नगरसेवक राहुल माने या सामाजिक संस्थेचे दिलीप कांबळे व गृहनिर्माण विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.