Monday, November 11, 2024
Home ताज्या कोल्हापुर स्टार्टअप मिशन' ची संकल्पना कौतुकास्पद - डॉ. माशेलकर - कोल्हापूर बरोबरच...

कोल्हापुर स्टार्टअप मिशन’ ची संकल्पना कौतुकास्पद – डॉ. माशेलकर – कोल्हापूर बरोबरच देशभरातील नवयुवकांना सुवर्णसंधी – पालकमंत्री ना. पाटील

‘कोल्हापुर स्टार्टअप मिशन’ ची संकल्पना कौतुकास्पद – डॉ. माशेलकर                  कोल्हापूर बरोबरच देशभरातील नवयुवकांना सुवर्णसंधी – पालकमंत्री ना. पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोष्टी वेगळ्या पद्धतीने करणे म्हणजेच संशोधन असते आणि नवसंकल्पना ही कोणालाही सुचू शकते. त्यासाठी शोधक नजर आणि नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ इच्छिणाऱ्या नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना कोल्हापूर स्टार्टअप मिशनच्या माध्यमातून नक्की पाठबळ मिळेल. नवसंकल्पकांच्या सहभातून कोल्हापूर शहराचा विकास साधण्यासाठी पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर आणि डी.वाय.पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या कोल्हापूर स्टार्टअप मिशन या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री ना. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आयआयटी कानपूर इंनोव्हेशन केंद्राचे प्रा.डॉ.अमिताभ बंडोपाध्याय उपथित होते.
डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, कोणताही स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी संकल्पना सुचणे, हेच महत्वाचे ठरते, किंबहुना कोणत्याही स्टार्टअप साठी संकल्पना हेच खरे भांडवल असते. संकल्पना जर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरली तर ती समाजाच्या विकासाठी पूरक ठरते. कोल्हापूरचा इतिहास पाहता, कोल्हापूरने जगाला खूप नव्या संकल्पना दिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पाठबळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर शहरातील स्थानिक प्रश्न सोडविताना कोल्हापुरातील युवकांमध्ये संशोधन आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी स्टार्ट-अप आणि संशोधक यांना आवाहन करणे हा कोल्हापूर स्टार्ट-अप मिशनचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी कोल्हापूर शहरातील विविध नागरी समस्या यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याअंतर्गत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, हवा गुणवत्ता व्यवस्थापन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ई-गव्हर्नन्स, कृषी, सार्वजनिक वाहतूक,नागरिक-शासन सुसंवाद या विषयांवर नवसंकल्पकांनी उपाय सुचविणे अपेक्षित आहे. लवकरच कोल्हापुरात आयटी पार्क सुरु होईल. देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोल्हापुरातील युवा पिढीला आपल्या शहरातच संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण वार्षिक निधीच्या पाच टक्के रक्कम नवउद्योजकांना पाठबळ देण्यासाठी उपलब्ध करणार आहे.
आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, कोरोनानंतरच्या काळात प्रगती साधण्यासाठी शासन, उद्योग आणि शिक्षण व्यवस्था यामध्ये समन्वय महत्वाचा ठरणार आहे. डिजिटल शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या नव्या गोष्टी पुढे आल्या आहेत. युवा पिढीला रोजगारक्षम बनविण्यासाठी स्टार्टअपला पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न राहील. या उपक्रमातून निवड होणाऱ्या स्टार्टअपना लागणाऱ्या पायाभूत सुविधा डी.वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून नक्की देण्यात येतील.आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना योग्य नियोजन करावे लागते. कोल्हापूर स्टार्टअप मिशन सारख्या उपक्रमातून शहराच्या समस्यांसाठी आधुनिक तांत्रिक सहकार्य नक्की मिळेल.

अशी असेल स्टार्टअप निवड प्रक्रिया
१) स्टार्टअप कडून संकल्पना मागविणे – १५ ते २४ जानेवारी
२) स्टार्टअप कनेक्ट वेबिनार – १८ ते २४ जानेवारी
३) अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्टार्टअपच्या नावांची घोषणा – २६ जानेवारी
४) अंतिम फेरीतील स्टार्टअप्स कडून सादरीकरण – २८ आणि २९ जानेवारी
५) विजेत्या स्टार्टअप्सची घोषणा – ३१ जानेवारी
विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्या वतीने प्रत्येकी रुपये ५ लाख बक्षीस कोल्हापूर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हापूर बरोबरच देशातील युवा पिढी स्टार्टअपच्या माध्यमातून आपले योगदान देऊ शकते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.kolhapurstartupmission.com या वेबसाईट अर्ज करावेत. यातील विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्या वतीने प्रत्येकी रुपये ५ लाख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर हे इन्क्युबेशन साठी सहकार्य करणार आहेत, असे ना. सतेज पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments