कोल्हापूर महापालिका उपायुक्तपदी रविकांत आडसुळ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका उपायुक्तपदी रविकांत आडसुळ यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.रविकांत आडसुळ हे निगवे दुमाला,तालुका करवीर,जिल्हा कोल्हापूर येथील मूळचे रहिवाशी आहेत त्यांचे शिक्षण एमबीए झाले आहे.२००८ ते २०१० PSI पदावर काम केले आहे.२०१० ते २०१४ गट विकास अधिकारी,पंचायत समिती पलूस जिल्हा सांगली येथे काम केले आहे.२०१४ ते २०१८ सांगली जिल्हा परिषद मध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) या पदावर काम केले आहे.तर २०१८ ते २०२० उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद कोल्हापूर याठिकाणी काम केले आहे.
त्यांनी उल्लेखनीय काम
दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग नोंदणी ऑनलाईन करून दिव्यांग लाभार्थी ना साहित्य उपलब्ध करून दिले आहे शिवाय इ टपाल ट्रॅकिंग सिस्टीम,अभिलेख स्कॅनिंग, इ गव्हर्नन्स उपक्रम राबविले आहेत त्यामुळे
पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जिल्हा परिषद ला प्राप्त झाला,व
यशवंत पंचायत राज पुरस्कार राज्यस्तरावर जिल्हा परिषदेस प्राप्त झाला.