Friday, July 19, 2024
Home ताज्या सावलीच्या 15 वर्षपूर्तीनिमित्ताने 'द ब्रीज' महत्वाकांक्षी प्रकल्प

सावलीच्या 15 वर्षपूर्तीनिमित्ताने ‘द ब्रीज’ महत्वाकांक्षी प्रकल्प

सावलीच्या 15 वर्षपूर्तीनिमित्ताने ‘द ब्रीज’ महत्वाकांक्षी प्रकल्प

कोल्हापूर/प्रतिनिधी : रुग्णसेवा आणि पुनर्वसन या क्षेत्रात गेली 15 वर्षे सातत्यपुर्ण दैदिप्यमान काम करणार्या सावली केअर सेंटरने आपल्या बहुविध अशा प्रकल्पांद्वारे इतर केअर सेंटरपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावलीने रुग्णांबरोबरच अंपगांच्या क्षेत्रातही सेवा-सुश्रुषा आणि पुनर्वसनामध्ये नविन मापदंड स्थापन केले आहेत. कोणत्याही शारीरिक वा मानसिक कारणांमूळे परावलंबित्व आलेल्या रुग्णांची सुश्रुषा केंद्रामार्फत केली जाते. संस्थेला 15 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने संस्थेने ‘द ब्रीज’ महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.याबद्दल अधिक माहिती देताना संस्थेचे प्रमुख किशोर देशपांडे म्हणाले,भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कुशल खेळाडूंची संख्या उपलब्ध असूनही जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी दिसून येत नाही. त्याची कारणे बघता असे लक्षात आले की, कुठलाही खेळाडू एकदा राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर पुढील वाटचालीसाठी त्याला विदेशामध्ये जाऊन अॅडव्हान्स ट्रेनिंग घ्यावे लागते. जसजसा तो आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू लागतो तसतसे विदेशातील ट्रेनिंगचा कालावधी वाढू लागतो. परंतु प्रत्येक खेळाडूला हे विदेशात जाणे परवडेलच असे नाही. त्यामूळे कितीतरी निष्णात खेळाडू आर्थिक परिस्थितीमूळे त्यांचे करीयर राष्ट्रीय स्तरावर जाऊन थांबवतात. भारताच्या दृष्टीने हा फार मोठा तोटा आहे. बहूदा हेच कारण असावे की भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कारणांमूळे अनेक निष्णांत गुणी खेळाडू पोहोचू शकत नाहीत.त्यामूळे विदेशामध्ये मिळणारे अॅडव्हान्स ट्रेनिंग भारतात उपलब्ध करुन देण्याचा विचार संस्थेने केला. अभ्यासाअंती असे लक्षात आले की, भारतामध्ये तांत्रिक बाबी, आवश्यक सुविधा, खेळ शिकवतानाच्या पद्धती, आणि फिजिशिअन, फिजिओथेरपीस्ट, कोच, न्युट्रीशनीस्ट, सायकॉलॉजीस्ट यांच्यातर्फे मार्गदर्शन, असलेच तरी या तज्ञांमधील आपापसातील ताळमेळ अशा अनेक बाबतीत सुधारणेला भरपूर वाव आहे.भारतामध्ये स्पोर्टस् इंज्युरी झाली असल्यानंतरच फिजिओथेरपीस्टकडे प्रामुख्याने जातात. एखादा खेळाडू आजारी पडला असता फिजिशिअनकडे जातात. तर एखाद्या खेळाडूला डिप्रेशन/अॅन्गझायटी जाणवली असता सायकॉलॉजीस्टकडे नेले जाते. म्हणजेच या सर्व तज्ञांची मदत आपण उपचाराकरीताच घेतो. वास्तविक खेळाडू घडविण्यासाठी या तज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. दुर्दैवाने भारतात कोचेसच गेम स्किल्सबरोबर बॉडी फिटनेस, स्टॅमिना बिल्डिंग, आहार, मानसिक संतुलन या सर्व बाबींकडे लक्ष देतात. यामूळे कोचेसवर अतिरिक्त ताण येतो. अपरिहार्यपणे त्यांना त्यांचे मुख्य काम असलेल्या गेम्स स्कील ट्रेनिंगला आवश्यक तेवढे तास देता येत नाहीत.
वास्तविक एखादा खेळाडू घडवण्याचे काम तज्ञांच्या टीमने करणे आवश्यक आहे. म्हणजे फिटनेससाठी फिजिशिअन, खेळाला आवश्यक असणारे मसल्स/जॉईंटस्/लिगामेंटस्/टेंडन्स तयार करण्यासाठी फिजिओथेरपीस्ट, मानसिक आरोग्य आणि संतुलनाकडे सायकॉलॉजीस्ट आणि आहाराकडे न्युट्रीशन एक्सपर्ट या तज्ञांचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे. कोचने फक्त गेम स्कील्सवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळाडू केंद्रीत करुन या सर्व तज्ञांमध्ये आवश्यक तो ताळमेळ असायला हवा.
भारतातील क्रिडाविश्वात असणार्या प्रमुख कमतरता आहेत.भारतात खेळाला कायम दुय्यम स्थान मिळते आहे. करीयर म्हणून खेळाकडे पाहणारे खेळाडू कमी प्रमाणात पहायला मिळतात.खेळाडूंच्या क्षमता संवर्धनासाठी तज्ञांची मदत अपवादात्मक स्थितीत घेतली जाते. मुळात अशा तज्ञांची उपलब्धता फक्त मोठ्या शहरांपूरती मर्यादित आहे. आणि जी आहे ती बर्याच खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. अत्याधूनीक तंत्रज्ञानाचीही आपल्याकडे वानवा आहे. मायक्रोलेव्हल परफॉर्मन्स, असेसमेंटची यंत्रणा फक्त निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. महाग असल्याने बरेचसे खेळाडूंना ती परवडतही नाही.जगातील विविध देशांमधील नैसर्गिक स्थिती वेगवेगळी असते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्या त्या देशातील वातावरणाशी जुळवण्याचे प्रशिक्षणही देणे आवश्यक आहे. खेळ चांगला असूनही वातावरणाशी जुळवून न घेता आल्याने खेळाडूंच्या कामगीरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा प्रशिक्षण केंद्रांची सोयही आपल्याकडे अभावानेच आहे.त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांमध्ये आहाराची उपलब्धता, चव यातही वैविध्य आहे. खेळाडूला या सर्व आहारव्यवस्थेशी जुळवून घेण्याचे अथवा त्यावर सक्षम पर्याय देण्याची आवश्यकता आहे. खेळांच्या प्रशिक्षणाबरोबरच हेही घटक महत्वाचे ठरतात.डोपिंग आणि प्रतिबंधीत पदार्थ यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियमांचे ज्ञानही महत्वाचे आहे. भारतातील अनेक खेळाडूंना याचे प्राथमिक ज्ञानही नसल्याचे दिसून येते.
 कोचेस/फिटनेस ट्रेनर तयार करण्याच्या प्रशिक्षणाचाही आपल्याकडे मोठा अभाव दिसून येतो. भारतात बरेचसे माजी खेळाडू कोच म्हणून काम करताना दिसतात. त्यांचे कोचींग हे त्यांना मिळालेले प्रशिक्षण आणि अनुभव यावर आधारीत असते, ज्यामध्ये काही मोठया कमतरता राहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजुनही आपल्याकडे पारंपारीक पद्धतीने खेळाडू तयार केले जातात. जागतिक पातळीवर उपलब्ध असलेले तंत्रज्ञान भारतात आणणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ते तंत्रज्ञान हाताळणारे कुशल मनुष्यबळ घडवणेही गरजेचे आहे.खेळाडूंमध्ये असलेले ग्रुपीझम, असोसिएशनच्या पातळीवर असणारे राजकारण, कौशल्यापेक्षा मर्जीतील खेळाडूंना संधी देणे अशा अनेक गोष्टींमूळे भारतील क्रिडाविश्व ग्रासलेले आहे. केंद्रशासनच काही ठोस निर्णय घेऊन या गोष्टींवर आळा घालू शकते.द ब्रीज या प्रकल्पामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या पदकसंख्येमध्ये अमुलाग्र वाढ व्हावी
यासाठी अत्याधूनीक यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळाच्या सहाय्याने अद्ययावत प्रशिक्षणाची उपलब्धता सर्वसामान्यांना परवडेल अश्या माफक दरात असेल.यामध्ये अद्ययावत फिजिओथेरपी युनिट असेल.याद्वारे तज्ञ फिजिओथेरपीस्ट अद्ययावत उपकरणांच्या सहाय्याने त्या त्या खेळासाठी आवश्यक असणार्या मसल्स / जॉईंटस् / लिगामेंटस् / टेंडन्स ची स्ट्रेन्थ, स्टॅमिना, इंन्ड्युरन्स (टिकावूपणा), फ्लेग्झीबिलिटी (लवचिकता), पॉवर, रिअॅक्शन टाईम, अॅजिलिटी (चपळपणा) आदीच्या संवर्धनाकडे लक्ष देतील.अधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोचेस/प्रशिक्षक खेळाडूंच्या हालचालींचे मायक्रो लेव्हलपर्यंत अवलोकन करुन त्यातील कमतरता/सुधारणा याबद्दल मार्गदर्शन करतात. या युनिटमध्ये तंत्रज्ञान हाताळण्याकरता कुशल मनुष्यबळ आहे. बॉडी फिटनेससाठी स्वतंत्र युनिट असेल. जिथे योगा-मेडीटेशन बरोबरच फिजिशिअन खेळाडूंच्या फिटनेस हार्ट/लंग्ज यांचा स्टॅमिना बिल्डिंग याबाबतीत मार्गदर्शन करत आहेत.कुठलाही खेळ हा आधी मनात सुरु होतो आणि मग मैदानात उतरतो. मानसशास्त्र खेळाडू घडवण्यात अत्यंत महत्वाचे अंग आहे. आत्मविश्वास वाढवणे, एकाग्रता वाढवणे, आवश्यक असणारा आक्रमकपणा बाणवणे या एखाद्या खेळाडूसाठी अत्यंत आवश्यक असणार्या गोष्टी सायकॉलॉजीस्ट करु शकतो. या युनिटमध्ये मानसशास्त्राचा स्वतंत्र विभाग कार्यन्वित आहे ज्यामध्ये आवश्यक त्या सर्व थेरपीज उपलब्ध आहेत. डोपींग जागृती कार्यक्रमअंतर्गत फिजिशिअन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील डोपिंग पॉलिसी, प्रतिबंधीत ड्रग्ज याविषयी मार्गदर्शन करण्यात येते. बर्याचवेळा अनवधानाने किंवा माहितीच्या अभावी काही औषधे घेतल्यामूळ गुणी खेळाडूंचे करीयर धोक्यात येऊ शकते. त्याचबरोबर खेळांसंदर्भातील कायदे, मेडिको-लिगल केसेस याविषयीही मार्गदर्शन केले जाते.फुड कोर्ट: प्रत्येक खेळाच्या गरजेप्रमाणे आहारव्यवस्था बदलणे गरजेचे असते. त्याचबरोबर स्पर्धाकाळातील आणि सरावकाळातील आहारामध्येही योग्य तो बदल असणे गरजेचे असते. विविध देशांमध्ये वेगवेगळ्या आहारपद्धती असतात. त्या आहारपद्धतींशी जुळवून घेणेही क्रमप्राप्त असते. या विभागामार्फत खेळाडूंना या सर्व बाबतीत मार्गदर्शन केले जाते.स्पोर्टस् इंज्युरीज बर्या करण्यासाठी फिजिओथेरपीस्ट, फिजिशिअन आणि सर्जन सेवा देतात. इंज्युरीज झालेल्या खेळाडूंसाठी रिटर्न टू स्पोर्टस् हा प्रकल्प राबवला जातो. यामध्ये उपचाराबरोबरच योग्य त्या खबरदारीच्या सहाय्याने खेळाडूला पुर्ववत खेळण्यासाठी तयार केले जाते. स्पर्धाकाळात खेळाडूंना येणारे डिप्रेशन/अँग्झायटी दुर करण्यासाठी स्पेशल कौन्सिलींग विभाग आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त निवास व्यवस्था आहे. जगातील विविध वातावरणांची सवय होण्याच्या दृष्टीने डायव्हर्सीफाईड क्लायमेटींक कोर्टस् असतील यामध्ये 2 डिग्रीपासून ते 50 डिग्री सेल्सीयस पर्यत तापमान कमी-जास्त होऊ शकेल जेणेकरुन खेळाडूंना सर्व प्रकारच्या तापमानाशी जुळवून घेण्याचा सराव होईल
अद्ययावत फिजिओथेरपी / सायकॉलॉजी आणि न्युट्रीशन युनिट गरम पाण्याचा हायड्रोथेरपी टँक,
प्रशिक्षित तज्ञ आणि अनूभवी मनुष्यबळ,आऊटडोअर वर्कआऊट साठी प्रशस्त ग्राऊंड आणि सगळ्यात महत्वाचं आपले उद्देश साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा दृष्टीकोन यामुळे 2024 च्या ऑलम्पिक स्पर8आपले भारतीय खेळाडू नक्कीच मेडल्स आणतील असा विश्वास किशोर देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पत्रकार परिषदेसआहारतज्ज्ञ सुप्रिया बोरचाटे, क्रीडा मानसोपचार तज्ञ भार्गवी मंगुडकर,डॉ.जयश्री कुराडे,फिजिओथेरपीस्ट डॉ. राजकुमारी नायडू, ब्रिजेश रावळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments