Saturday, January 11, 2025
Home ताज्या समृद्ध साहित्याची लाभलेली परंपरा जपण्यासाठी वाचनकट्टा चळवळीची समाजाला गरज - सिक्कीमचे माजी...

समृद्ध साहित्याची लाभलेली परंपरा जपण्यासाठी वाचनकट्टा चळवळीची समाजाला गरज – सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन

समृद्ध साहित्याची लाभलेली परंपरा जपण्यासाठी वाचनकट्टा चळवळीची समाजाला गरज – सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्याला समृद्ध साहित्याची परंपरा लाभली आहे, ही परंपरा जपण्यासाठी वाचनकट्टासारख्या लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. वाचनकट्टा संस्थेच्या वतीने आयोजित साप्ताहिक वाचनविश्वच्या युथ आयकॉन २०२१ या विशेषांकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात हा शानदार समारंभ संपन्न झाला.

वाचनकट्टा संस्थेच्या वतीने साप्ताहिक वाचन विश्व युथ आयकॉन २०२१ या विशेषांकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे करण्यात आले. यावेळी वाचनाचे महत्त्व स्पष्ट करुन नव्या पिढीला वाचनाच्या प्रवाहात आणण्यासाठी वाचनकट्याने राबवलेल्या उपक्रमाचे खा. पाटील यांनी कौतुक केले. समृद्ध साहित्यिकांनी केलेले लिखाण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बोलताना खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, माझे जोडीदार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात आलेला महापूर असो, कोव्हिड सारख्या आपत्तीमधूनही सक्षमपणे हाताळत आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे जिल्हासाठी एका अर्थाने दौलतच ठरले आहेत. गौरवमूर्ती आयपीस डी. कनकरत्नम मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील डी कनकरत्नम यांनी  वनसंरक्षक ते आय पी एस असा थक्क करणारा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे खा. पाटील म्हणाले. खा. श्री निवास पाटील यांच्या हस्ते मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, कराडचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, पल्लवी यादव, डॉ. शशिकांत पाटील यांना यंदाचा युथ आयकॉन २०२१ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे डॉ. बी. एम. हिर्डेकर, वाचनकट्टा संकल्प युवराज कदम, प्रा. टि.के.सरगर, संजय पाटील, गट शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील, सतबा कदम, वनिता साबणे, प्रा. ज्योती पाटील, उत्तम तलवार, प्रा. रेखा निर्मळे, प्रा. निगार मुजावर, वनिता कदम, ओंकार कागीणकर, तृप्ती कागीणकर, अपुर्वा खांडेकर, सचिन लोंढे-पाटील, भारतकुमार शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments