Tuesday, July 23, 2024
Home ताज्या हरित समृध्‍दी” पुरस्‍कार मिळाले बद्दल ‘गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

हरित समृध्‍दी” पुरस्‍कार मिळाले बद्दल ‘गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

हरित समृध्‍दी” पुरस्‍कार मिळाले बद्दल ‘गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : गार्डन्‍स क्‍लब कोल्‍हापूर यांच्‍याकडून दिला जाणारा “हरित समृध्‍दी” पुरस्‍कार गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांना मिळाल्‍याबद्दल गोकुळच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत त्यांचा सत्‍कार करण्‍यात आला.एक प्रगतशील शेतकरी म्हणून काम करत असताना त्यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्‍या  पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून  नवे मापदंड निर्माण केले. अरुण नरके यांनी गेली ४५  वर्षे सातत्याने डेअरी, कृषि आणि सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. विविध सामाजीक कार्यामध्‍ये त्‍यांचा पुढाकार नेहमिच राहिला आहे. “हरित समृध्‍दी पुरस्‍काराने त्‍यांच्‍या कार्याची त्‍यांना पोच पावती  हरितयोध्‍दा म्‍हणूनच  हा प्रथम वर्षीय पुरस्‍कार त्यांना मिळाला आहे. याबरोबरच शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्‍यापक डॉ. तुकाराम द. डोंगळे यांचा महाराष्‍ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्‍स यांच्‍यातर्फे “यंग असोसिएट्स”  या पदावर निवड झाल्‍याबद्दल  व संघाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कैलाश पुकळे यांनी विभागीय कार्यालय हातकणंगले परिसरात गोचीड तापावर प्रतिबंध करणेसाठी जास्‍तीत-जास्‍त लसीकरण  करून जनावरांचे आरोग्‍य चांगले राखण्‍याचे काम केलयाबद्दल यांचाही सत्‍कार संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्‍या हस्‍ते करणेत आला.गोचिड तापामध्‍ये जनावरांचे तापमान १०५ f ते १०६ f पर्यंत जाऊन रक्‍तातील हिमोग्‍लोबीनचे प्रमाण कमी होते. जनावरे अशक्‍त होतात, डोळ्यांमधुन पाणी येते तसेच रक्‍ताचे प्रमाण कमी झाल्‍याने जनावरे बसतात व उपचार न झालेस  दगावतात. वरील सर्व त्रास टाळण्‍याकरिता गोचीड ताप लसीकरण हा रामबाण उपाय आहे. ते करूण घेतल्‍यास  या आजारापासुन जनावरांना पुर्णपणे मुक्‍तता मिळते. असे डॉ. कैलाश पुकळे यांनी सत्‍कारा दरम्‍याण सांगीतले. यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील (आबाजी), अरूण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वास जाधव, आमदार व संचालक राजेश पाटील, पी.डी. धुंदरे, धैर्यशिल देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, रामराज देसाई-कुपेकर, विजय तथा बाबा देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर(माई),सौअनुराधा पाटील(वहिनी), कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम. पाटील, जनसंपर्क अधिकारी,व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments