Friday, July 19, 2024
Home ताज्या विद्यापीठातील क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्याचा निर्णय

विद्यापीठातील क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्याचा निर्णय

विद्यापीठातील क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्याचा निर्णय

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड-१९च्या निकष, नियमावलीच्या अधीन राहून शिवाजी विद्यापीठातील क्रीडा सुविधा विद्यापीठाच्या क्रीडापटूंना ओळखपत्र दाखवून सरावासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे. डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडील सुविधा कोविड-१९ महामारीच्या अनुषंगाने शासनामार्फत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सरावासाठी बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. तथापि, सध्या सर्वत्र टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे आणि विद्यापीठाच्या क्रीडापटूंकडून होत असलेल्या मागणीचा विचार करता विद्यापीठाच्या जीमसह क्रीडा सुविधा क्रीडापटूंसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. क्रीडापटूंना ओळखपत्र दाखविल्यानंतरच या सुविधांचा लाभ घेता येईल तसेच कोविड-१९संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, सध्या एम.फील. व प्रि-पीएच.डी. कोर्सवर्कच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना विद्यापीठामार्फत वसतीगृह नियंमांचे पालन करून निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments