झाडे आपल्याला तणावमुक्त करतात – डॉ. संजय डी. सावंत गार्डन्स क्लबचा सुवर्ण महोत्सव; ‘किंग ऑफ द शो’ आणि ‘क्वीन ऑफ द शो’ हे संजय घोडावत ग्रुपकडे
कोल्हापूर/प्रतिनिधी: आपण झाडांबरोबर असलो की आपले मन प्रसन्न राहते आणि ही एक चांगली गोष्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात माणूस आपल्या सर्व चिंता यापासून मुक्त होतो. म्हणूनच झाडे आपल्याला तणावमुक्त करतात, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांनी केले. गार्डन्स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय पुष्परचना स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गार्डन्स क्लबने कोल्हापूरला झाडे जपण्याची सवय लावली आहे. म्हणूनच प्लास्टिक असलेले पुष्पगुच्छ देण्यापेक्षा कधीही रोप देणे उत्तम असते. यामुळे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे सवय लागते. तसेच परदेशी फुलांपेक्षा आपली भारतीय दुर्मिळ फुले ही अधिक आकर्षक मोहक व त्यांचे उपयोग ही तितकेच चांगले आहेत. ते जपण्याचाही प्रयत्न गार्डन्स क्लबने इथून पुढे करावा असे डॉ.संजय डी. सावंत यांनी सांगितले. हरितदूत बनून या गार्डन्स क्लबने कोल्हापूरला नेहमीच ‘हरित कोल्हापूर’ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सुवर्णमहोत्सवाचे परंपरा लाभलेल्या गार्डन्स क्लब यंदाचा हा पन्नासावा महोत्सव आहे. या पन्नास वर्षांचा इतिहास गार्डन क्लबचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र ओबेराय यांनी विषद केला. एक रोपापासून सुरुवात करून आता या क्लबचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९६९ साली स्थापन झालेल्या या गार्डन्स क्लबने वृक्ष, झाडे, रोपे, फुले यांचे सतत संवर्धन व जतन केले आहे. गेल्या पन्नास वर्षात हरितसेना तयार करण्यासाठी गार्डन्स क्लबने अथक प्रयत्न केले. ‘लोकल टू ग्लोबल’ जाण्याचा प्रयत्न नेहमीच क्लबने केलेला आहे. कोल्हापूर बोनसाय क्लबची स्थापना हा त्यातीलच एक भाग आहे. जयपुर मधील फ्लॉवर शो मध्ये देखील गार्डन क्लब सहभाग नोंदवला आहे. २०१६ साली वनश्री पुरस्काराने गार्डन क्लब सन्मानित झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावण्याचा प्रयत्न गार्डन्स क्लब नक्कीच करणार आहे, असा विश्वास
गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.
यावेळी गार्डन्स क्लबचे मुखपत्र असणाऱ्या रोजेट अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गार्डन क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ. धनश्री पाटील यांच्या स्टडीज इन एक्स्प्लोरेशन ऑफ बाय पेस्टीसिडीअल पोटेन्शियल ऑफ सम प्लांट या संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले. गार्डन्स क्लबची स्थापना १९६९ झाली. पहिले पुष्प प्रदर्शन १९७० साली घेण्यात आले. होते. त्या पहिल्या पुष्पप्रदर्शन यापासून ते या पन्नासाव्या पुष्पप्रदर्शनापर्यंत साक्षीदार असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
तर हरित समृद्धी पुरस्कारांने गोकुळचे ज्येष्ठ संचालक व गार्डन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य अरुण नरके यांना सन्मानित करण्यात आले. गार्डन्स क्लबच्यावतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये आल्या आहेत या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच स्पर्धा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यामध्ये गुलाब, एकच जातीचे गुलाब, बटण गुलाब ,बटण गुच्छ,कोणतेही गुलाब,गुलाब तीन टप्प्यातील, विविध फुले, पुष्परचना, कुंड्यातील रोपे, बोन्साय, ट्रेलँडस्कोप व टेरारीयम, बुके स्पर्धा, गार्डन ऑफ द इयर,सॅलेड डेकोरेशन हँगिंग बास्केट आणि मुक्तरचना या विविध गटातील विजेत्यांचा पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘क्वीन ऑफ द शो’ आणि ‘किंग ऑफ द शो’ हे संजय घोडावत ग्रुपने पटकावले.डॉ.मैथिली नाईक यांची ‘वृक्षायुर्वेद’ प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथमधील वनस्पती संगोपन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.श्रीराम अंबड,उपाध्यक्ष शशिकांत कदम,सचिव पल्लवी कुलकर्णी,खजानिस राज अथणे, ज्येष्ठ सदस्य अरुण नरके, रवींद्र ओबेराय, डॉ. धनश्री पाटील, इंदूताई सावंत,जयश्री कजारीया,रवींद्र साळुंखे,संगीता कोकितकर, रोहिणी पाटील,सुभाषचंद्र अथणे, विलास बकरे,डॉ.दिलीप शहा, शशिकांत जोशी,संगीता सावर्डेकर, वर्षा वायचळ, यांच्यासह गार्डन्स क्लबचे सर्व संचालक व सदस्य, वृक्षप्रेमी,उद्यानप्रेमी उपस्थित होते.