श्रीपतराव बोंद्रे जन्म शताब्दी वर्षाची आज सोमवारी सांगता
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांचा जन्म शताब्दी वर्ष सांगता समारंभ उद्या सोमवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. यावेळी आठवणीतील दादा या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह दसरा चौक येथे हा कार्यक्रम होत आहे. स्वर्गीय श्री पतराव बोंद्रे यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचा सत्कार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते व आठवणीतील दादा या गौरव ग्रंथाचे प्रकाशन खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.