बेजबाबदार अधिकाऱ्यांवर बडतर्फ ची कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करु – जयराज कोळी
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बापट कँम्प येथील कत्तलखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या भोंगळ कारभाराविरोधात आजपासून(सोमवार) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर बडतर्फ ची कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा ही यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी दिला आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील हे महापालिका प्रशासनाने नेमून दिलेले काम न करता बेजबाबदार पणे महापालिकेच्या प्रोजेक्ट इंजिनिअरच्या जबाबदारीचं काम करत आहेत. तर कत्तलखान्यामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या बकऱ्यांची तपासणी न करताच त्यांची कत्तल व विक्री केली जाते. तसेच डॉ.विजय पाटील यांनी महापालिकेतील काही नगरसेवकांना हाताशी धरून काही ठाराव मंजूर करुन घेतलेत. आणि त्यामाध्यमातून आपल्या मर्जीतील माणसांचे आर्थिक फायदा करण्याचे काम केले आहे.असा आरोप यावेळी जिल्हा अध्यक्ष जयराज कोळी यांनी केला आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना बडतर्फ करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करु असा इशारा यावेळी जयराज कोळी यांनी दिला आहे.आंदोलनात उपाध्यक्ष दगडू माने यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,महिला सहभागी झाल्या आहेत.