कोल्हापूर बंगाली सुवर्णकारची सभा खेळीमेळीत
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर संघ,कोल्हापूरची पहिली वार्षिक सभा शनिवारी खेळीमेळीत झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांनी गेल्या वर्षभरामध्ये घेतलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. ते म्हणाले,संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेखनीय कामामध्ये संघाच्या सभासदांना कोरोनाच्या कालावधीत धान्य वाटप, रक्तदान शिबिर,माध्यम प्रतिनिधींबरोबरच पोलिसांना ९५ मास्कचे वाटप केले. सभासदांना गावी पाठविण्याबरोबर आर्थिक मदतही केली. याचबरोबर नूतन वर्षामध्ये नव्या उमेदीने आणखी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच नवीन वर्षाचे कॅलेंडर प्रकाशित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेला इंद्रजित सामंत, नारायण भौमिक, समीर पत्रा, मानस निद्दा, देबाशिष दोडिया, जॉय पाल यांच्यासह संघाचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.