आंबोलीचे साईज्योती रिसॉर्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरेल -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
आंबोली/प्रतिनिधी : पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथील साईज्योती रिसॉर्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या हॉटेलने ग्राहकाभिमुख उत्तम व दर्जेदार सेवा द्यावी, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते साईज्योती रिसॉर्ट या हॉटेलचे उद्घाटन झाले.
चव्हाणवाडी ता. आजरा येथील युवा उद्योजक संभाजीराव चव्हाण व सौ. ज्योती चव्हाण यांनी हे हॉटेल सुरू केले आहे.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी सारख्या छोट्याशा खेड्यात गोरगरीब सामान्य कुटुंबात जन्मलेल्या युवा उद्योजक संभाजीराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत यशस्वी वाटचाल केली आहे. साईज्योती रिसॉर्टचा लौकिक ते ग्राहक सेवेतून निश्चितच वाढवतील.
संभाजीराव चव्हाण म्हणाले, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण सेवा देण्याच्या चिकाटीतूनच या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हा टप्पाही यशस्वीरीत्या पूर्ण करू.
यावेळी युवा उद्योजक संभाजीराव चव्हाण व सौ. ज्योती संभाजीराव चव्हाण या दांपत्यासह कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, सिंधुदुर्गाच्या महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, कणकवलीचे नगरसेवक अबीद नाईक, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री दळवी, संभाजीराव तांबेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, मुकुंद देसाई, आजरा पंचायत समितीचे सभापती ऊदयराज पवार, उपसभापती शिरीष देसाई, आजरा कारखान्याचे संचालक मारुतराव घोरपडे, वसंतराव यमगेकर, दीपक देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.