श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्तगोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवसराष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. गोकुळ संघाच्या प्रधान कार्यालयामध्ये माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरूण नरके यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जिल्ह्यातील दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या स्मुर्तीना उजाळा देण्यात आला. यावेळी मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्यातील वीरमरण पावलेल्या शुर विरांना तसेच देशाच्या सीमेवर सेवा करत असताना आपल्या जिल्ह्यातील शहीद जवान ऋषीकेश जोधळे, संग्राम पाटील हे शहीद झाले यांनाही गोकुळ परिवाराकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरूण नरके यांनी स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांनी नेहमीच सहकारातील संस्था मजबुतीकरणावर भर दिला. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असल्याशिवाय दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देता येणे शक्य नाही.याकरीता त्यांनी नेहमीच गोकुळसारख्या संस्थांना मार्गदर्शन केले.त्यांच्या विचाराने चाललेल्या गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे. डॉ.कुरियन यांचा ग्रामीण दूध उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड विश्वास होता.म्हणूनच त्यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना ठेवली. त्यामुळेच गोकुळसारखा संघ आज देशामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये आघाडीवर आहे.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरूण नरके, श्री.रणजितसिंह पाटील, श्री.विश्वास पाटील (आबाजी), संचालक श्री.विश्वास जाधव,श्री.पी.डी.धुंदरे, श्री.उदय पाटील, कार्यकारी संचालक श्री.डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी श्री.एस.एम.पाटील, व्यवस्थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.