Saturday, July 19, 2025
spot_img
Home Blog Page 130

पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक – खासदार धनंजय महाडिक यांचे उदगार

0

“खासदार चषक”खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य तर पुण्याचा निखिल दीक्षित उपविजेता ,कोल्हापूरचा सम्मेद तृतीय

पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक – खासदार धनंजय महाडिक यांचे उदगार

पुलाची शिरोली/प्रतिनिधी : मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी :- जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर आठवा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित पुण्याचा निखिल दीक्षित व अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे या तिघांचे समान आठ गुण झालेमुळे सरस टायब्रेक गुणामुळे रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य ठरला तर पुण्याच्या निखिल दीक्षितला उपविजेत्यापदावर व अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीराजला रोख २१ हजार रुपये व आकर्षक चषक, निखिल ला रोख पंधरा रुपये व आकर्षक चषक तर सम्मेद ला रोख दहा हजार रुपये व आकर्षक चषक खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, हायवे लगत, पुलाची शिरोली,कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात झाल्या.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही प्रवेश शुल्क नसलेली ही भारतातली पहिलीच खुली जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आहे.* याशिवाय परगावच्या खेळाडूंची राहण्याची मोफत सोय करण्यातआली व सर्व खेळाडू पालकांना स्पर्धा स्थळी मोफत चहा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ आदरणीय खासदार धनंजय महाडिक बी चॅनेल चे चेअरमन व खासदार क्रीडा महोत्सवचे प्रणेते पृथ्वीराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित झाला.यावेळी स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर, स्पर्धा सचिव धीरज वैद्य, स्पर्धा समन्वयक उमेश पाटील सर व उत्कर्ष लोमटे सर व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले व पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन केले. या स्पर्धेच्या उत्तम संयोजनाबद्दल संयोजक व पंचांचे कौतुक करून आभार मानले व पुढच्या वेळी या स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना इचलकरंजीचे करण परीट, रोहित पोळ व विजय सलगर सांगलीचे पौर्णिमा उपळवीकर विजय माने व दीपक वायचळ, कोल्हापूरचे मनीष मारुलकर,आरती मोदी, सूर्याजी भोसले,उत्कर्ष लोमटे व महेश व्यापारी व सोलापूरचे उदय वगैरे यांचे सहकार्य लाभले. सीमा पुजारी, आनंदराव कुलकर्णी, राजू सोन्याच्या, अमित मोदी, राठोड मॅडम, रवींद्र निकम, डॉ. हरीश पाटील, प्रभाकर कांबळे, शेवडे साहेब, खान मॅडम, विजय माने सर, उदय वगैरे सर,कविता पाटील, गिरीश बाचीकर, यांच्या हस्ते सर्व उत्तेजनार्थ बक्षीस वितरित करण्यात आली.

बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
खुला गट १५ बक्षिसे

१)श्रीराज भोसले रेंदाळ २) निखिल दीक्षित पुणे ३) सम्मेद शेटेे कोल्हापूर ४) ओंकार कडव सातारा ५) राहुल शर्मा पुणे ६) अभिषेक गणीगेर बेळगाव ७) निरंजन नवलगुंद बेंगलोर ८) मानस गायकवाड सोलापूर ९) सुयोग वाघ अहमदनगर १०) ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर ११) पुष्कर ढेरे मुंबई १२)सोहम खासबारदार कोल्हापूर १३) तुषार शर्मा कोल्हापूर १४) अभिषेक पाटील मिरज १५) प्रणव पाटील कोल्हापूर.

उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (६० वर्षावरील)

१) राजू सोनेचा सांगली २) रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर ३) दिलीप कुलकर्णी सांगली ४) माधव देवस्थळी कोल्हापूर ५) भारत पाटोळे निपाणी.

उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू

१) ऋचा पुजारी कोल्हापूर २) दिव्या पाटील जयसिंगपूर ३) श्रेया हिप्परगी जत ४) दिशा पाटील जयसिंगपूर ५ शर्वरी कबनूरकर कोल्हापूर.

उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू

१) अभिजीत कांबळे तासगाव २) मोहसीन सय्यद राजापूर ३) विनोद सावंत पुणे.

उत्कृष्ट बिगर गुनांकित बुद्धिबळपटू

१) सिद्धेश नार पुणे २) स्वरूप साळवे गडहिंग्लज ३) दीपक क्षीरसागर लोणंद ४) पुनम चांडक धारवाड ५) सिद्धांत तेलकर लोणंद.

उत्कृष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटू

१) श्रीधर तावडे कोल्हापूर २) अथर्व चव्हाण कोल्हापूर ३) इम्रान बारस्कर शिरोली ४) आदित्य आळतेकर कोल्हापूर ५) शंकर साळुंके कोल्हापूर.

उत्कृष्ट तेराशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू

१) विवान सोनी इचलकरंजी २) बालकृष्ण पेडणेकर सावंतवाडी ३) प्रदीप दहाडे पुणे ४) सृष्टी हिप्परगी जत ५) हर्ष शेट्टी सांगली.

उत्कृष्ट सोळाशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू

१) दीपंकर कांबळे फलटण २) शर्विल पाटील कोल्हापूर ३) अनिश नाईक गोवा ४) प्रवीण कामत कर्नाटक ५) प्रदीप आवडे सातारा.

उत्कृष्ट एकोणवीसशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू

१) प्रशांत नाईक मेंगलोर २) आदित्य सावळकर कोल्हापूर ३) रवींद्र निकम इचलकरंजी ४) मुद्दसर पटेल मिरज ५) संतोष कांबळे कोल्हापूर.

उत्कृष्ट पंधरा वर्षाखालील बुद्धिबळपटू

१) सुयोग वडके पुणे ३) अपूर्व देशमुख सातारा ३) प्रसन्ना जगदाळे बेळगाव ४) साई मंगनाईक बेळगाव ५) ईश्वरी जगदाळे सांगली.

उत्कृष्ट तेरा वर्षाखालील बुद्धिबळपटू

१) अथर्व तावरे इचलकरंजी २) आदित्य चव्हाण सांगली ३) प्रज्वल वरुडकर कोल्हापूर ४) विक्रमादित्य चव्हाण सांगली ५) सोहम शेटे बार्शी.

उत्कृष्ट अकरा वर्षाखालील बुद्धिबळपटू

१) कश्यप खाकरीया सांगली २) अभय भोसले जांभळी ३) सान्वी गोरे बार्शी ४) रियार्थ पोद्दार इचलकरंजी ५) अद्विक फडके सांगली.

उत्कृष्ट नऊ वर्षाखालील बुद्धिबळपटू

१) शौर्य बगाडिया इचलकरंजी २) वरद पाटील बस्तवडे ३) वेदांत बांगड इचलकरंजी ४) अर्णव पाटील कोल्हापूर ५) सिद्धांत थबज बेळगाव.

उत्कृष्ट सात वर्षाखालील बुद्धिबळपटू

१)अन्वेषा सोनी इचलकरंजी २)सुरज सलगर इचलकरंजी ३) प्रज्ञेश घोरपडे कोल्हापूर.

राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कणेरी मठ येथे शुभारंभ

राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाचा विचार सर्वदूर रुजेल

पर्यावरण संवर्धनाचा वैश्विक संदेश सर्वदूर घुमेल

कोल्हापूर/प्रतिनिधी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. समारंभास शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भैय्या जोशी, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर, महेश शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
विकास योजना व प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले जात असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आपले शासन सर्वसामान्यांचे शासन असून शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. यास केंद्र शासनाचेही सर्व सहकार्य असून केंद्राकडून सर्व प्रस्ताव मंजूर होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी काळाची गरज ओळखून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची संकल्पना मांडल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वामीजींना धन्यवाद दिले. अध्यात्म शास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वाची सांगड घालून सिद्धगिरी मठावर उत्तम उपक्रम राबविले जात आहेत. हा लोकोत्सव मठाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येकाचा आहे. या संकल्पनेत प्रत्येकाने सहभाग व योगदान दिल्यामुळेच हा लोकोत्सव यशस्वी होत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लोकोत्सव चळवळ व्हावी व हा उत्सव घराघरात पोहोचावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ग्रीन हायड्रोजन, सोलार एनर्जी असे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पातून दहा ते बारा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.पर्यावरणाच्या विनाशाने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम केले नाही तर भावी पिढी आपणास माफ करणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करुन पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलायला हवी, असे उप मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचेल. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला माता आणि निसर्गाला ईश्वर मानले जात असून पर्यावरण रक्षणाचे शाश्वत विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.
कणेरी मठ येथे काडसिद्धेश्वर स्वामीजींनी शेतीत प्रयोग केले. पर्यावरण पूर्वक शेती बनवली. कणेरी मठ मोठे ज्ञानाचे भंडार असून हे ज्ञान समाजापर्यंत पोहचणे गरजेचे आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव राज्याच्या अन्य शहरात आयोजित करून पंचमहाभूतांचे संवर्धन करण्याबाबत व्यापक काम होणे गरजेचे आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वेगवेगळ्या कल्पना राबविल्या आहेत. त्यांच्या या कल्पना भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरतील.
काडसिद्धेश्वर स्वामीजींनी विषमुक्त शेती करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले असल्याचे सांगून या महोत्सवात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण स्वागत करतो, असेही पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.
भैय्या जोशी म्हणाले, या लोकोत्सवातून देण्यात येत असलेला पर्यावरण रक्षण आणि शांतीचा संदेश विश्वभर पोहोचेल. पंचतत्वांचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी आयोजित या समारंभात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृतीची संकल्पना प्रत्यक्षात राबवल्याबद्दल त्यांनी काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कार्याचे कौतुक केले.
‘जाणूया पंचमहाभूतांचे महत्त्व जपूया त्यांचे अस्तित्व’ हा संदेश जगभर देऊया, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले. ते म्हणाले, आज पंचमहाभूतांचा समतोल ढासळला असल्याने यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. यासाठी ‘पर्यावरण रक्षणाची स्वतः पासून सुरुवात करुया, निसर्गाची हानी थांबवुया व पर्यावरण रक्षण हाच परमार्थ समजुया’, असे आवाहन त्यांनी केले. कणेरी मठ येथे वेस्ट पासून बेस्ट बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप सुरु करण्याचा मानस असल्याचे स्वामीजी यांनी यावेळी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शासनाच्या प्रत्येक विभागाने आपले योगदान दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले
या समारंभात ‘सुमंगल विचार संपदा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि कापडी पिशव्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समारंभास पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर शहर व परिसरातील एकूण १४ घरफोडी चोरीचे गुन्हें उघडकीस तीन आरोपीं ताब्यात

0

कोल्हापूर शहर व परिसरातील एकूण १४ घरफोडी चोरीचे गुन्हें उघडकीस तीन आरोपीं ताब्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर व परिसरातील एकूण १४ घरफोडी चोरीचे गुन्हें उघडकीस घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून २४,३२,६४६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे यांनी पत्रकार पतिषदेत दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोरेवाडीतील नंदनवन कॉलनीतील निखिलेश राजाराम सासमिले यांचा बंद बंगला लक्ष्य करत चोरट्यानी ६ नोव्हेंबर २०२२रोजी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.याबाबत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान राजू सल्वराज तंगराज (रा. कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा) यानं त्याच्या साथीदारां सोबत सासमिले यांच्या बंगल्या सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती समोर आली होती.गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून राजू सल्वराज तंगराज आणि भिमगोंडा मारुती पाटील (वय २९,रा. हलकर्णी, ता.गडहिंग्लज) या दोघांना ताब्यात घेतले . त्यांनी करवीर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १३ घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह सुमारे एकोणीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

बालनाट्याची परंपरा संपली आहे. लहान मुलांसाठी  चित्रपट नाही, मालिका नाही, काही नाही – अभिनेता सुबोध भावे

0

बेळगांव येथील ‘पहिल्या बालनाट्य संमेलना’ची लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता
 
नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजेकरमणूक केली पाहिजे, हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा मुले नाटकाकडे येतील – अभिनेता सुबोध भावे

मुलांच्या भूमिकेतून  बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे  आवश्यक आहेत – अभिनेता सुबोध भावे

बालनाट्याची परंपरा संपली आहे. लहान मुलांसाठी  चित्रपट नाही, मालिका नाही, काही नाही – अभिनेता सुबोध भावे

पुण्यात मुलांना खेळायचे मैदान नाही इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते. – अभिनेता सुबोध भावे

बेळगांव/प्रतिनिधी : बेळगांवमध्ये प्रसिद्ध अश्या अनघोळ येथे मुंबईच्या ‘बालरंगभूमी अभियान’द्वारे’१ल्या बेळगांव बालनाट्य संमेलना’चा प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ रविवारी संपन्न झाला. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, “मला वडिलांनी  सहावीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलं. यामुळे माझा बालनाट्याशी संबंध आला. आपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहे. गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले की, बालनाट्याची परंपरा संपली आहे. लहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाही, मालिका नाही, काही नाही आहे. आपण मुलांसाठी काही करत नाही. समाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाही. ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. पुण्यात मुलांना खेळायचे असेल, तर दुर्दैवाने मैदान नाही. इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते. उत्तम बाग नाही, जिथे मुले खेळू शकतात. मुलांनी खेळायचे नाही, असे आपण ठरवले आहे. कोरोनाच्या काळात आपण मुलांना मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातले. आता ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड गोष्ट झाली आहे. मी लहानपणी जी बाल नाटके पाहिली, त्याची छबी आजही मनावर ताजी आहे. आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेत. जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील. आपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टाहास आहे, तो नाटकातून बाजूला व्हायला हवा. घरी आई – बाबा शहाणपणा शिकवतात, शाळेत शिक्षक शहाणपणा शिकवतात, परत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहे. मुलांना एक सकस मनोरंजन पाहिजे. नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे. नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे, हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा मुले नाटकाकडे येतील”.
बेळगांवच्या अनघोळ येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये सकाळच्या प्रहरात आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यशाळांमधे मुंबई, बेळगांव, कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळांमध्ये बेळगांवमधील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ६०- ६० विद्यार्थ्यांचे गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केली. गेली दोन दिवस बेळगावातील अनेक विद्यार्थ्यांना नाट्यसंमेलनात प्रशिक्षणसोबतच विविध बालनाट्य पहाण्यासाठी मशगूल होते, यासोबतच त्यांनी अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलन अध्यक्षा मीनाताई नाईक, ‘बालरंगभूमी अभियान,मुंबई’, ‘फुलोरा नाट्य संस्थे’च्या अध्यक्षा वीणाताई लोकूर,’अखिल भारतीय नाट्य परिषद’, बेळगांव अध्यक्षा संध्याताई देशपांडे, डॉ.राजेंद्र चव्हाण, देवदत्त पाठक आदी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा करून मनसोक्त आनंद लुटला.
पहिल्या गटातील कार्यशाळेत देवदत्तपाठक आणि मिलिंद केळकर यांनी मुद्राअभिनय, संघर्ष, कथानकाचं बीज, कथानक, कथानक आणि उपकथानकाची जोडणी, खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली. ती कौशल्ये देहबोली, संवाद, विसंगती, अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली. सभोवतालची माणसे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे, आदी स्वत:च्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावा, हे ही कार्यशाळेत सांगण्यात आलं. यातील मुलांशी पत्रकार शीतल करदेकर, प्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला.दुसऱ्या गटाचे संचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर जितेंद्र रेडकर, ओम कृष्णजी यांनी त्यांना मदत केली.राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतले. या  मुलांशी पत्रकार कपिल प्रभू, अतुल कुलकर्णी, नितीन फणसे आणि राम कोंडीलकर यांनी संवाद साधला. नाटकात काय करणे अपेक्षित आहे हे शिक्षकांनी आज शिकवल्याचे मुलांनी सांगितले. खेळातून कॉन्सन्ट्रेशन करायला शिकल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता.गट क्रमांक तीनमधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते.. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केली. यातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकर, युवराज अवसरमल, योगेश घाग, अभिजित जाधव  यांनी संवाद साधला. गट क्रमांक चारचे नेतृत्व नयना डोळस, भरत मोरे, मयुरी मोहिते, लीला हडप यांनी केले, तर नीता कुलकर्णी, अर्चना ताम्हनकर यांनी त्यांना मदत केली.
चौथ्या गटात शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते घेतली. शिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद – वाचक अभिनय, भूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले. त्यांना मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळले. यात सहभागी झालेल्या शिक्षक व पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे, नरेंद्र कोठेकर आणि सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. या चार गटातील विधार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी  चर्चा करून पत्रकारांनी आढावा घेतला.दुपारच्या सत्रात ‘शिरगांव हायस्कुल’, शिरगांव यांच्या विद्यार्थ्यांनी ‘धरतरी’, तसेच ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’, पुणे यांनी  ‘जीर्णोद्धार’, तर ‘रंगभूमी अभियान’, तळेगांव यांनी ‘माझी माय’ ही बालनाट्ये सादर करण्यात आली. यावेळी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, बेळगांव येथील प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित, अभिनेत्री सई लोकूर, संमेलन अध्यक्षा मीना नाईक, वीणा लोकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बालनाट्य सुरु होण्यापूर्वी जेष्ठ संपादक प्रफुल्ल फडके आणि पत्रकार शीतल करदेकर यांनी  संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतली, तर अभिनेत्री सई लोकूर आणि वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनीत मासावकर आणि कपील प्रभु यांनी घेत त्यांचा बाल नाट्य रंगभूमीवरील प्रवास उलगडून दाखविला.
मुंबईच्या ‘बालरंगभूमी अभियान’ संस्थेतर्फे ‘पहिल्या बेळगांव बालनाट्य संमेलनाचे’ आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य लाभले.
संमेलनाध्यक्ष मीना नाईक, उद्धघाटक सई लोकूर, स्वागताध्यक्ष संध्या देशपांडे, बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर, अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव देवदत्त पाठक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर  उपस्थित होते.

बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

0

बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना उद्या मंगळवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार १९५ केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण तीन लाख २१ हजार ३९६ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले, तर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्र देखील ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले.
‘कोविड’च्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा निकोप पार पडाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळस्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सवलती देण्यात येत असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

सुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह

0

सुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विचारांचा संग्रह असलेल्या या साहित्यकृतीचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
कणेरी मठ परिसरात २० ते २६ फेब्रुवारी या दरम्यान होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
“पर्यावरण संवर्धनाच्या जागरासाठी सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रम हा प्रेरणादायी ठरणार आहे. स्वामीजींचे अध्यात्म आणि विज्ञान यांचा सांगड घालत समाजाची उन्नती साधण्याचे विचार कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचणार आहे. स्वामीजींच्या विचार कार्यावर आधारित या पुस्तकामुळे पर्यावरण जागर, अध्यात्माचे महत्त्व, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून झालेला समाजाचा विकास हे सारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना नेहमी चांगल्या कामासाठी प्रवृत्त करेल.”असे कौतुकोदगार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.पत्रकार गुरुबाळ माळी यांचे हे अकरावे पुस्तक आहे. अक्षर दालनने ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीचे उपस्थित साऱ्याच नेत्यांनी कौतुक केले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार अण्णासाहेब जोले, आमदार प्रकाश आवाडे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राज्य पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला.

पंचमहाभूत लोकोत्सव लोकांची चळवळ बनून प्रत्येक घर पर्यावरण जागृतीसाठी कृतीशील व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साधू-संत – शास्त्रज्ञ – वैघ यांची देशभरातून मांदियाळी

अभूतपूर्व उत्साही वातावरणात ‘पंचमहाभूत लोकोत्सवास’ प्रारंभ

पंचमहाभूत लोकोत्सव लोकांची चळवळ बनून प्रत्येक घर पर्यावरण जागृतीसाठी कृतीशील व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर/प्रतिनिधी : आपला देश कृषीप्रधान असून आपण पूर्वापार निसर्गाची पूजा करतो. याच्या मुळाशी पर्यावरण रक्षण हाच हेतू आहे. शासनाचे प्रयत्नही सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आहे. यापुढील काळात आपल्याला सेंद्रीय शेती, गोशाळा यांसह प्रत्येक पर्यावरण उपक्रमास प्राधान्य द्यावे लागेल. त्यामुळे कणेरी मठावर आयोजित लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृती करायला हवी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वरस्वामिजी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दिपक केसरकर ,खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार महेश शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे ,जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, ‘दैनिक’ पुढारी चे योगेश जाधव, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने नागपूर समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला विकास करतांना तो पर्यावरणपूरक असा करावा लागेल. या लोकोत्सवाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती वाढवून ती राज्यव्यापी करावी लागेल आणि ती लोक चळवळ बनवावी लागेल ‘
या प्रसंगी तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मानवी जीवनाशी निगडित असलेल्या पंचमहाभूतांच्या सजग जाणवेसह त्यांच्या होत असलेल्या प्रदुषणाविषयी व्यापक जनजागृती आणि सामुहीक प्रयत्न यांची अनुकरणीय कार्यकमपद्धती या लोकोउत्सवातील विविध विषयांवरील विचार मंथनातून नक्कीच विकसित होईल.’’
प्रारंभी सर्वांचे स्वागत करतांना सिद्धगिरी कणेरी मठाचे पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी म्हणाले, ‘‘समाजातील विविध संस्था, संघटना आणि प्रशासन यांनी मिळून आपले सामूहिक दायित्व म्हणून पंचमहाभूताच्या मानवी हस्तक्षेपामुळे वाढत चाललेल्या प्रदुषणात आवर घालण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. याचसमवेत उद्याच्या नागरिक असणार्‍या शाळेय आणि महाविद्यालयीन युवकांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचा प्रारंभ या लोकोत्सवातून होईल असा विश्वास व्यक्त करत अवघा समाज भौतिक प्रगती वेगाने करत असतांना वेड्यांचे रुग्णालये वाढणे आणि मानसोपचारतज्ञांची संख्या वाढणे हे चिंताजनक आहे. त्याचे उत्तर या लोकोत्सवाच्या मंथनातून मिळेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आपण जर वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही – उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस

या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘आपण जर वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याल क्षमा करणार नाही, अशी सध्या स्थिती आहे. जगातील अनेक संस्कृतींचा र्‍हास झाला; मात्र भारतीय संस्कृती मात्र अद्यापही टिकून आहे. भारतीय संस्कृतीत नदीला माता मानले असून आपण पर्यावरणाला ईश्वर मानून कृती करतो. जल-वायू परिवर्तन ही आपल्यासमोरील गंभीर समस्या बनत असून भारत कर्करोगाची राजधानी बनतो का काय ? इतकी वाईट स्थिती आहे. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या नदीची इतकी वाईट स्थिती आहे की तीला ‘गंगा’ म्हणावे का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापुढील काळात पंचगंगेचे प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. यापुढील काळात आम्ही राज्यात २५ लाख हेक्टर सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत. याचसमवेत कोळशापासून वीज उत्पादन अल्प करून सोलर उर्जा वाढवणे यांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतीसाठी ८ हजार मेगावॅटचा प्रकल्प शेतकर्‍यांसाठी आम्ही सिद्ध करत आहोत. सरकार ज्या ज्या योजना आणते किंवा ज्या ज्या गोष् टींवर प्रबोधन करते त्यावर सामान्य लोक लगेच कृती करत नाही; मात्र जर तुमच्यासारख्या साधू-सन्यासी यांनी जर सांगितले, तर ते लगेच ऐकून कृतीत आणतात. त्यामुळे हा लोकोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.’’
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. भैय्याजी जोशी म्हणाले, ‘‘देवभूमी असलेल्या भारतात आपण जन्म घेतला हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. पंचमहाभूतांचे रक्षण केल्यास आपले जीवन सुरक्षित राहिल. विकासाच्या मार्गावर आपण पुढे-पुढे जात असतांना तुर्कीसारखे मोठे मोठे भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ या समस्यांना आपल्याला का सामोरे जावे लागत आहे ? याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.’’ शेवटीविश्वस्त उदय सामंत यांनी आभार प्रदर्शन केल्यावर सामुदायिक राष्ट्रगीताने या उद्घाटन सत्राची सांगता झाली.
क्षणचित्रे
प्रारंभी कणेरी मठाची व्याप्ती, त्या माध्यमातून चालू असलेले विविध कार्य यांची माहिती देणारा एक दृकश्राव्यपट दाखवण्यात आला. उभारण्यात आलेल्या व्यासपीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. येथे पृथ्वी, तेज, आकाश, वायू, जल यांची माहिती देणारे विशेष फलक उभारण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प.पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी यांच्या विचारावर आधारित पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या ‘सुमंगलम विचार संपदा’ या पुस्तकाच्या मराठी आणि कन्नड आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

चौकट
भारतीय जीवनपद्धतीत सन्यास’ पेक्षा कोणताही अलंकार मोठा नाही ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी
या प्रसंगी स्वामिजी म्हणाले, ‘‘मी कोणत्याही प्रकारची निवडणूक या जन्मात तरी लढवणार नाही. भारतीय जीवनपद्धतीत ‘सन्यास’ पेक्षा कोणताही अलंकार मोठा नाही आणि संन्यास हाच मोठा सन्मान आहे.’’
सकाळी तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध आयुर्वेदिक, सेंद्रीय शेती उत्पादने, पारंपरिक बी-बियाणे, रोपे, तसेच मूल्यशिक्षण, धार्मिक ग्रंथ यांचे प्रदर्शन याचे कक्ष लावण्यात आले असून त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे .

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न

0

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न

पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काडसिध्देश्वर स्वामीजी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शोभायात्रेचा मार्ग महात्मा गांधी मैदान -बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड- पापाची तिकटी -गंगावेश- पंचगंगा नदी असा होता. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. महात्मा गांधी मैदान येथे सुरु झालेली शोभायात्रा पंचगंगा नदी घाट येथे विसर्जित झाली. देशभरातील चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांनी विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील घडशी – गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव  पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव  पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या ७ दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, माणिक पाटील-चुयेकर आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
नदीला माता मानण्याची भारतीय संस्कृतीची प्राचीण पुरातण परंपरा आहे. नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नदीची आरती करण्याची पध्दत संपूर्ण भारतात पाळली जाते. गंगा नदीच्या आरतीप्रमाणेच या ठिकाणी पंचगंगा नदी आरतीचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी काडसिध्देश्वर स्वामीजींना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाद्वारे पाणी, ध्वनी प्रदुषण टाळूया, पाण्याच्या, उर्जेचा अतिरिक्त वापर टाळूया, गरजेपूर्तेच वाहने वापरूया, माती आणि वृक्ष याचे संवर्धन करूया असा संदेश देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्या आग्रा येथील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिले तिथे महाराजांची जयंती साजरी होणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी पंचगंगा नदीच्या आरतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची अनौपचारिक सुरूवात झाली असून येत्या ७ दिवसात ३० ते ४० लाख लोक यासाठी उपस्थित राहतील, असा विश्वास श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला. व त्यांनी या लोकोत्सवात मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी .

0

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी .

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली .
कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर, महसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दिप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून या दोघांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले . त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला दोघा मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला . हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येते तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले . फेरफार , नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहे . या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले . या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. प्रा . संजय मंडलिक, खा . धैर्यशिल माने , विभागीय आयुक्त सौरभ राव, पर्यावरण विभागाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे, काड सिद्धेश्वर स्वामी महाराज, भैय्याजी जोशी, हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह संचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .