Saturday, July 19, 2025
spot_img
Home Blog Page 128

गोकुळच्या लिंगनूर (गडहिंग्‍लज)शितकरण केंद्रावर अत्याधुनीक कॅन वॅाशरची उभारणी

0

गोकुळच्या लिंगनूर (गडहिंग्‍लज)शितकरण केंद्रावर अत्याधुनीक कॅन वॅाशरची उभारणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या लिंगनूर(गडहिंग्‍लज) येथील दूध शीतकरण केंद्रावर अत्याधुनिक कॅन वॅाशरचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील यांचे शुभ हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले कि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक सघामार्फत दररोज सरासरी १४.५० लाख लिटर्स दूधाचे संकलन केले जात आहे. यापैकी लिंगनूर येथील दूध शीतकरण केंद्रावर सहकारी संस्थाकडून दररोज सकाळ व सायंकाळ पाळीत मिळून दररोज सरासरी १ लाख ५० हजार ते २ लाख लिटर्स दूधाचे संकलन कॅनव्दारे होत आहे. यापूर्वी लिंगनूर येथील दूध शीतकरण केंद्रावर कॅनची स्वच्छता करणेसाठी ६०० कॅन प्रतितास क्षमतेचा कॅन वॅाशर कार्यरत होता.परंतू दैनंदीन दूध हाताळणीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता संघाने संस्थाकडून आलेले कॅन खाली करून कॅन वॅाशरव्दारे स्वच्छ करून पुन्हा संस्थेस पाठविणे व हे काम जलदगतीने होणेसाठी नवीनच १२०० कॅन प्रतितास क्षमतेचा अत्याधुनीक कॅन वॅाशर संघाच्या लिंगनूर शीतकरण केंद्रावर बसविणेत आला आहे. नवीन बसविणेत आलेल्या कॅन वॅाशरमूळे दूधाचे कॅनची स्वच्छता चांगल्या प्रकारे व जलद होवून निर्जंतूक कॅन संस्थांना देता येणार आहेत. शिवाय यामूळे स्टीम व पाण्याचा वापर देखील कमी होवून बचत होणार असल्याचे संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, लिंगनूर शाखा अधिकारी शशिकांत गायकवाड, संकलन अधिकारी के.डी.आमते व संघाचे कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त  २६ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंत महालक्ष्मी महोत्सवाचे आयोजन

0

राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त  २६ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंत महालक्ष्मी महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत कोल्हापूरमध्ये ८ दिवस महालक्ष्मी महोत्सव होत आहे. सुमारे १३ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या उत्सवाच्या ठिकाणी भव्य कथा पंडाल आणि भव्य १०८ कुंडिया हवन यज्ञ कुटीर पूर्ण झाले आहेत. केरळचे राज्यपाल माननीय आरिफ खान मोहम्मद खान यांच्या हस्ते रविवार, २६ फेब्रुवारी रोजी भव्य श्री लक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ५ मार्च रोजी संत श्री वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूज्य धनलक्ष्मी माँ यांच्या ५ हजार पंचधातू मूर्ती दर्शन व पूजनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याप्रसंगी गरिबांना रेशन आणि ब्लँकेटचे वाटपही करण्यात येणार आहे.
संत श्री वसंत विजयजी महाराज यांच्या हस्ते सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पूजा करण्यात येणार असून यामध्ये कोणत्याही महिला लाल कपड्यात आणि पुरुष शुद्ध पांढऱ्या पूजेच्या कपड्यात सहभागी होऊ शकतात असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत महालक्ष्मी पुराणातील अमृतमयी महाकथेचे पठण केले जाणार आहे. दुपारी ४ ते ७ या वेळेत हवन यज्ञ होईल. रात्री ८ ते १० या वेळेत आयोजित भजन संध्याकाळात प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लक्खा आपल्या भजनाने भक्तिपूजा करणार आहेत.गुरुदेव डॉ श्री वसंत विजयजी महाराज यांच्या मुखातून माँ महालक्ष्मीची अमृतकथा ऐकण्यासाठी बांधण्यात आलेल्या भव्य पंडालमध्ये २१ फुटी साक्षात् महालक्ष्मी आणि ९ फुटी अष्टलक्ष्मी व अष्टभैरव भक्त विराजमान आहेत. माँ महालक्ष्मी शक्तीपीठात माँची कथा ऐकण्याची संधी भक्तांना मिळणार आहे. कथा स्थळावरच महायज्ञासाठी १०८ कुंड्या अतिशय भव्य हवन यज्ञ कुटीरही तयार करण्यात आले आहेत. ८ दिवस चालणाऱ्या महायज्ञात २५० पंडित १ कोटी लक्ष्मी मंत्रांचा जप आणि १ लाख श्री सूक्तांचे पठण केले जाणार आहे.

अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

0

पंचमहाभूत लोकोत्सव पाचवा दिवस – ‘राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलन’

अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा विविध कामांसाठी वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात किंवा १० गावांच्या मध्यठिकाणी वैद्यवन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुजरातमध्ये पारंपरिक वैद्यांचे स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात वैद्यांसाठी विद्यापीठ निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. पंचमहाभूत लोकोत्सवात पाचव्या दिवशी ते ‘राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलना’त ते बोलत होते. या वेळी कर्नाटकचे प.पू. शंकरवृद्धा स्वामीजी, बी.व्ही.जी. गृपचे अध्यक्ष एच.आर्. गायकवाड, कर्नाटक आयुषचे माजी संचालक जी.एन. श्रीकांथांय्या, पारंपरिक वैद्य परिषदेचे अध्यक्ष जी. महादेवय्या, केरळ येथील वैद्य महासभेचे अध्यक्ष मन्नार जी राधाकृष्णन वड्यार, वरिष्ठ शास्त्रज्ञ मनीष बोरवालीया यांच्यासह देशभरातील विविध आयुर्वेदिक वैद्य उपस्थित होते.

या वेळी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘ एकमेकांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, विविध उपचार पद्धतींची देवाण-घेवाण व्हावी हा या संमेलनामागील उद्देश आहे. वैद्यांचे संघटन निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध भागांत वैद्यांच्या निर्माणासाठी शिबिरांचे आयोजन करायला हवे. मानवजातीतील ८० टक्के रोग पारंपरिक वैद्य बरे करू शकतात. त्यासाठी मोठ्या रुग्णालयांची आवश्यकता नसते. केवळ २० टक्के रुग्णांसाठीच रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामवैद्य असणे आवश्यक आहे.’’ यावेळी भारतातील विविध राज्यातून आलेल्या पांरपारिक वैधा च्या उपचार पद्धती च्या माहिती चे संकलन लिखित व चित्रफिती रुपात करण्याचेही एकमताने ठरविण्यात आले .

‘सातारचा सलमान’ ३ मार्चला येणार भेटीला

0

‘सातारचा सलमान’ ३ मार्चला येणार भेटीला

कोल्हापूर/प्रतिनिधी : हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच जबरदस्त सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक जबरदस्त चित्रपट ३ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत आदी नामवंत कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. हेमंत ढोमे यांचीही झलक या चित्रपटात दिसत आहे. अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल. या चित्रपटातील ‘सातारचा सलमान’ आणि ‘आय वॉन्ट टर्मरिक’ ही भन्नाट गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
‘स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून ही कथा एका अशा तरुणाची आहे, ज्याचे हिरो बनायचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेली मदत यात दिसत आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का, याचे उत्तर मात्र ‘सातारचा सलमान’ पाहिल्यावरच मिळणार आहे. या चित्रपटातील गाणीही संगीतरसिकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. ‘सातारचा सलमान’ या प्रत्येकालाच ठेका धरायला लावणाऱ्या टायटल ट्रॅकला आदर्श शिंदे यांच्या आवाजाने अधिकच रंगत आली असून सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर ‘आय वॉन्ट टर्मरिक’ या मस्तीने भरलेल्या गाण्याला नागेश नॉर्वेकर यांच्या आवाजाचा साज चढला आहे. या दोन्ही गाण्याचे गीतकार क्षितिज पटवर्धन आहेत तर संगीतकार अमितराज आहेत.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो आणि या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी अशी वेळही येते की, आता सगळं संपलं, असं वाटतं. मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण आपलं काम करत राहावं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, ही ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल.”

भारतीय संस्कृती इतर देशापेक्षा वेगळी – केरळचे राज्यपाल आसिफ खान

0

भारतीय संस्कृती इतर देशापेक्षा वेगळी – केरळचे राज्यपाल आसिफ खान

कणेरी मठ/प्रतिनिधी : जीवन जगताना एकटा जगणे अवघड आहे हेच एकत्र जगलो तर खूप सोपे जाते, त्याप्रमाणे निसर्गाचे सुद्धा असेच आहे, पृथ्वीसुद्धा पंचमहाभूतांनी बनली आहे, यामध्ये पृथ्वी, आकाश, जल, अग्नी ,वायू हे सुरक्षित राहिले पाहिजेत तरच आपण पुढील आयुष्य सुरक्षित जगू. असे मत केरळचे राज्यपाल आसिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.. ते कनेरी मठ येते सुरू असलेल्या पंचमहाभूत सुमंगलम लोकोस्तव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार मानसिंग नाईक ,आमदार महेश शिंदे उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले मनुष्याला एकटे जीवन जगणे मुश्कील असून सामुदायिक सर्वांनी जगले पाहिजे. समूहाची ताकद एकटे राहण्यापेक्षा खूप मोठी असते देश हितासाठी व देश रक्षणासाठी देश प्रदूषण मुक्तीसाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. याची सुरुवात कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी चालू केली असून ही मालिका संपूर्ण देशभर गाजेल .आपल्या हितासाठी आता सर्वांनी एकत्र यायला पाहिजे . प्रत्येक व्यक्तीमध्ये दिव्यता आहे मग तो काळा असो अथवा गोरा स्त्री असो अथवा पुरुष सर्वांना दिव्यता व आत्मा एकच आहे. मनुष्यप्रमाणेच झाड, पक्षी ,किडा यांच्यामध्ये सुद्धा आत्मा असून यांचे सुद्धा रक्षण झाले पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही टिकली पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही इतर देशांपेक्षा नक्कीच वेगळे आहे असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आजचा कार्यक्रमाचा सहावा दिवस असून आज कनेरी मठावर जवळपास चार ते पाच लाख लोकांनी हजेरी लावली होती. संपूर्ण मठ परिसर नागरिकांनी व्यापून गेला होता .सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली या कार्यक्रमा वेळी कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले काडसिद्धेश्वर स्वामीजी इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कणेरी मठावर ५० गाईंचा शिळे अन्न खाल्याने मृत्यू, कणेरी मठ उत्सव समितीकडूनही केला गेला खुलासा 

0

कणेरी मठावर ५० गाईंचा शिळे अन्न खाल्याने मृत्यू,
कणेरी मठ उत्सव समितीकडूनही केला गेला खुलासा 

कोल्हापूर/प्रतिनिधी : सिद्धगिरी कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव ऐन  भरत आला असताना तब्बल ५० च्या वर गायी  अचानक मृत्यूमुखी पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अजूनही ३०च्या वर गायीची  प्रकृती चिंताजनक आहे.गाईंच्या अचानक मृत्यूच्या वृत्ताला पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त पठाण यांनी दुजोरा दिला असून मृत गाईंचे पोस्टमार्टम करून फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रासह अनेक राज्यातील राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि साधुसंतांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवात देशी गाई पालन आणि प्रदर्शन हा देखील एक महत्त्वाचा भाग होता. पण महोत्सव ऐन भरात आला असताना तब्बल ५० च्यावर गायी अचानक मृत्युमुखी पडल्या. तर काही अत्यावस्थ आहेत.महोत्सवासाठी परिसरातून आलेल्या भाकऱ्या आणि लोकांसाठी केलेले जेवण शिल्लक राहिल्यानंतर या गाईंना अति प्रमाणात खायला दिल्याने हा प्रकार घडला आहे का?  याशिवाय गाईंच्या मृत्यूची  इतर कारणे ही तपासण्यात येत आहे.दरम्यान या बातमीच्या वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या  पत्रकारास धक्काबुक्की केली गेली आहे. या घटनेचा सर्वच पत्रकार संघटनांकडून निषेध नोंदविला गेला आहे.

कणेरी मठ उत्सव समीतीकडून आलेला खुलासा

दरम्यान गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात घटना अतिशय दुर्दैवी – श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने खुलासा केला आहे.
श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे.
कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भाकड व भटक्या गाईना कोणी वाली नाही अशा जनावरांनाहि कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन पोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठी ही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारावरील निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाहि घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईलच. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती आहे. असा खुलासा हा करण्यात आला आहे.

कणेरी मठावर ५० गाईंचा शिळे अन्न खाल्याने मृत्यू ,कणेरी मठ उत्सव समितीकडूनही आला खुलासा 

0

कणेरी मठावर ५० गाईंचा शिळे अन्न खाल्याने मृत्यू

कणेरी मठ उत्सव समितीकडूनही आला खुलासा 

कोल्हापूर/प्रतिनिधी : सिद्धगिरी कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव ऐन  भरत आला असताना तब्बल ५० च्या वर गायी  अचानक मृत्यूमुखी पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अजूनही ३०च्या वर गायीची  प्रकृती चिंताजनक आहे.गाईंच्या अचानक मृत्यूच्या वृत्ताला पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त पठाण यांनी दुजोरा दिला असून मृत गाईंचे पोस्टमार्टम करून फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रासह अनेक राज्यातील राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि साधुसंतांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवात देशी गाई पालन आणि प्रदर्शन हा देखील एक महत्त्वाचा भाग होता. पण महोत्सव ऐन भरात आला असताना तब्बल ५० च्यावर गायी अचानक मृत्युमुखी पडल्या. तर काही अत्यावस्थ आहेत.महोत्सवासाठी परिसरातून आलेल्या भाकऱ्या आणि लोकांसाठी केलेले जेवण शिल्लक राहिल्यानंतर या गाईंना अति प्रमाणात खायला दिल्याने हा प्रकार घडला आहे का?  याशिवाय गाईंच्या मृत्यूची  इतर कारणे ही तपासण्यात येत आहे.दरम्यान या बातमीच्या वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या  पत्रकारास मारहाण केली गेली.

 

कणेरी मठ उत्सव समीतीकडून आलेला खुलासा

दरम्यान गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात घटना अतिशय दुर्दैवी – श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने खुलासा केला आहे.
श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे.
कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भाकड व भटक्या गाईना कोणी वाली नाही अशा जनावरांनाहि कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन पोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठी ही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारावरील निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाहि घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईलच. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती आहे. असा खुलासा हा करण्यात आला आहे.

सिध्दगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवूया – आचार्य देवव्रत

0

सिध्दगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवूया – आचार्य देवव्रत

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत ऋषी-मुनी यांची परंपरा असलेला, पंचमहाभूतांची पूजा करणारा देश आहे. आपण भौतिक विकास करतांना विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण केल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज अचानक ढगुफुटी होते, तसेच अन्य अनेक समस्या निर्माण होत आहेत. आश्रमाच्या माध्यमातून विविध कार्य करत काडसिद्धेश्वर स्वामींजींनी आयोजित केलेला पंचमहाभूत लोकोत्सव एक जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवू या, असे जाहीर /आवाहन गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ते पंचमहाभूत लोकोत्सवात ५ व्या दिवशी जल तत्त्व-महिला उत्सवात पहिल्या सत्रात बोलत होते. या ‘ /वेळी व्यासपीठावर कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री सौ. शशिकला जोल्ले, स्वामी संपूर्णानंद महाराज, राजस्थान येथील कृष्ण जाखड, ‘आय.आय.टी’ येथील प्रदीप मिश्रा, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, जलतज्ञ राजेंद्रसिंह, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
वेळीच पाण्याचा दुरुपयोग टाळा, अन्यथा पृथ्वी कदापी क्षमा करणार नाही ! – डॉ. हर्षा हेगडे
स्त्री आणि पाणी यांना एकमेकांपासून दूर करता येऊ शकत नाही. प्रत्येक जीवसृष्टीचा मुख्य घटक ‘पाणी’ आहे. पाणी हे इतके महत्त्वपूर्ण आहे की, भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका, अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापी क्षमा करणार नाही.’’
केमिकल आस्थापनांनी आतापर्यंत सर्वांत अधिक पर्यावरणाचा र्‍हास केला – प्रदीप मिश्रा
सध्या संपूर्ण विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी पीडित आहे. अशा परीस्थितीत पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रासायनिक आस्थापनांनी आतापर्यंत सर्वांत अधिक पर्यावरणाचा र्‍हास केला आहे. ‘स्त्री’मध्ये समाजाला सर्वश्रेष्ठ स्थानी नेण्याची शक्ती आहे. त्यामुळे स्त्रियांकडून पर्यावरण रक्षणाचे संस्कार मुलांवर होणे आवश्यक आहे. मानवाच्या अयोग्य जीवनप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे, ते टाळल्यास जलस्रोतांना पुन्हा पुनर्जीवन प्राप्त होईल.
तर वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रुप धारण करेल ! – गोपाल उपाध्याय, लोकभारती
नदीच्या किनारी रहाणार्‍या शेतकर्‍यांनी शेतीच्या पद्धतीत पालट करून नैसिर्गित शेती करण्याचा प्रयत्न करावा. लोकभारतीच्या माध्यमातून विविध स्तरांवर जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जलप्रदूषणाच्या संदर्भात समाज वेळीच जागृत न झाल्यास वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रुप धारण करेल.
समाजाने पर्यावरण जपण्यास शिकायला हवे – सौ. शशिकला जोल्ले, मंत्री, वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री, कर्नाटक
भारत देश संस्कृती, संस्कार आणि अध्यात्म यांनी भरलेला आहे. त्यामुळे आपण भारतभूमीत जन्माला आलो हे परमभाग्य आहे. लोक देशाची संस्कृती विसरत असल्याने महापूर, भूकंप, कोरोना यांसारखे संकटे येत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व आणि जतन होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याविषयी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सध्याच्या काळात समाजाने अधुनिकतेच्या नावाखाली पिझ्झा, बर्गर यांच्या आहारी जाण्याऐवजी पर्यावरण जपण्यास शिकले पाहिजे. वेळीच पाणी रक्षणासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर पाण्यावरून महायुद्ध होईल. वृक्षांच्या संवर्धनासाठी आम्ही निपाणी मतदारसंघात महिलांना प्रत्येकी १४ फळझाडांची रोपे दिली आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यास सांगितले, तसेच त्यांना घरगुती भाजीपाला लावण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

चौकट
एक किलो मांस सिद्ध करण्यासाठी एक सहस्र लीटर पाणी व्यय होते. त्यामुळे एका व्यक्तीने मांसाहार सोडल्यास १०० लोकांची तहान भागू शकते, असे प्रदीप मिश्रा यांनी नमूद केले .

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

0

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रिय शेती आवश्यक पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचवणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्नाटकच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह, आयआयटी बीएचयूचे प्रदीप मिश्रा, राजस्थानचे कृष्ण जाखड, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, पूर्णानंद स्वामी, प्रिया शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार विक्रम सावंत, आमदार शेखर निकम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रिय शेतीपद्धती तसेच पंचमहाभूत तत्वांच्या दालनांना व प्लॅस्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, प्राचीन काळी पंचतत्त्वांच्या संरक्षणाचे संस्कार प्रत्येकाला दिले जात होते. परंतु, सध्या आपल्या भौतिक सुखासाठी मानव पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. हे काम कोणत्याही जीवजंतूकडून होत नसून ते केवळ मानवाकडून होत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अति वापराने कॅन्सर सारख्या भयानक रोगांना सामोरे जावे लागत असून येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सेंद्रिय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम केवळ शासकीय यंत्रणेने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे. पंचमहाभूतांचे संरक्षण ही लोकचळवळ होणे गरजेचे असून हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या ठिकाणी राबवण्यात येत असलेले पर्यावरण रक्षणाचे विविध उपक्रम प्रेरणादायी आहेत. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या लोकसहभागातून मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी प्रत्येक महिलेने खारीचा वाटा उचलावा

कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, संस्कार, परंपरा, अध्यात्म यावर भर असणारा भारत देश आहे. फॅशनचे युग, वैज्ञानिक युग, कलियुग म्हणून आपण आपली संस्कृती, परंपरा विसरत चाललो आहोत. दुध, दह्याला बाजूला सारुन चॉकलेट, पिझ्झाकडे वळत आहोत. याचे दुष्परिणाम आपल्याला दुर्धर आजार आणि नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून भोगावे लागत आहेत. यावर केवळ पर्यावरण रक्षण हाच उपाय आहे. हे काम महिला शक्ती करु शकते. महिलांना गौरव, सन्मानाची वागणूक दिली तर समाजात निश्चित चांगला बदल घडतो. पर्यावरण रक्षणाचे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या बाळाला देवून पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलावा. येत्या काळात पाण्याचा जपून वापर केला नाही तर पाण्यासाठी महायुद्ध होऊ शकते, यासाठी पाण्याचा जपून वापर करा. मातीचे संरक्षण करा.. पर्यावरणाचे रक्षण करा, असे सांगून आरोग्य, क्रीडा, सेंद्रिय शेती, शिक्षण आदी क्षेत्रात काडसिध्देश्वर स्वामीजींनी महत्त्वपूर्ण कार्य केले असून यादृष्टीने कणेरी मठात सुरु असलेला हा पर्यावरण रक्षणाचा लोकोस्तव महत्वपूर्ण आहे, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, पूर्वीच्या काळी जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे पूजन आणि रक्षण केले जात असे. परंतु सध्या पंचतत्त्वांना हानी पोहोचवली जात असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. नीर, नारी आणि नदीला महत्व मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.
प्रदीप मिश्रा, गोपाल उपाध्याय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश मार्गदर्शनातून दिला. आभार उदय सावंत यांनी मानले.दरम्यान श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम, सेंद्रीय शेती, पंचमहाभूत तत्वांची माहिती देणारी दालने, शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आदींबाबत माहिती दिली.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ उत्साहात – शाहीद परवीन, वसंत भोसले यांचा डी.लिट. ने सन्मान

0

वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी कार्यरत रहा – डॉ. दिनकर एम. साळुंके यांचे आवाहन

डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ उत्साहात – शाहीद परवीन, वसंत भोसले यांचा डी.लिट. ने सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी :
भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जात असून औषध निर्मितीच्या बाबतीत आपण तिसर्‍या क्रमांकावर आहे. वैदयकीय सेवा व लस निर्मितीच्या क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधानामुळेच शक्य झाले आहे. आरोग्य क्षेत्रात आणखी वेगाने संशोधनाची गरज असून यासाठी वैदयकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यानी संशोधनाकडे वळावे असे आवाहन नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ दिनकर एम. साळुंखे यांनी केले. कोल्हापूर येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात भव्य शोभायात्रेने दिक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ वेदप्रकाश मिश्रा, मुबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ विजय खोले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या समारंभात ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शाहीदा प्रवीण गांगुली यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले तर डॉ. नवनाथ पडळकर यांना एक्सलन्स इन रिसर्च म्हणून सन्मानित करण्यात आले.

सतत संशोधन हवे

यावेळी बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, औषधाचा शोध व निर्मिती ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अनेक रोगांवर आपण प्रभावी औषधे तयार केली असली तरी असे काही रोग आहेत ज्यावर अदयाप ठोस उपाय सापडलेला नाही. ९०% औषधे विकासाच्या नंतरच्या टप्प्यात अयशस्वी होतात. त्यामुळे या क्षेत्रात सतत संशोधन होणे गरजेचे असून यात आपल्या सारख्या पदविधरांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. युनायटेड नेशन्सने २०१५ मध्ये शाश्वत विकासाठी चांगल्या आरोग्य सुविधा आवश्यक असून त्यसाठी २०३० चे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी भारतही वचनबद्ध आहे. मात्र १४० कोटी लोकसंख्येला पुरेसे ठरतील एवढे डॉक्टर आजही उपलब्ध नाहीत आपल्या आरोग्य व्यवस्थेतील समस्या सोडवण्याची बौद्धिक क्षमता आणि उत्तम व्यावहारिक ज्ञान भारताकडे आहे.संशोधनात सक्रियपणे गुंतलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना सध्या मोठी मागणी आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि ज्ञानाचा आरोग्य संशोधनाला खूप फायदा होऊ शकतो. येथे उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काहींनी संशोधन करिअर म्हणून निवडले तर मोठे सामजिक कार्यही करता येईल.

लस निर्मितीत भारत अग्रेसर

लस निर्मिती क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. भारताने उत्पादित केलेल्या लसींची जगभरात निर्यात केली जाते. जागतिक स्तरावर पुरवल्या जाणार्‍या एकूण लसींपैकी ६०% लसींचा वाटा फक्त भारताचा आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात भारताच्या लस निर्मितीच्या पराक्रमाचे जग साक्षीदार आहे. स्थानिक पातळीवर आणि जलद गतीने लस तयार करण्याच्या क्षमतेमुळेच आपण साथीच्या रोगाचा सामना करू शकलो. डिसेंबर २०२२ पर्यंत, भारतात कोविड-१९ लसीकरणाचे २.२ अब्ज डोस देण्यात आले. भारतातील शास्त्रज्ञांनी बनवलेल्या कोविड लसींनी १५० हून अधिक देशांना मदत झाली. कोविड १९ मुळे भारतात ४.५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यानंतर, प्रभावी लसीकरणामुळे किमान ४५ लाख मृत्यू टाळता आले. विक्रमी वेळेत १००कोटी लोकांना कोविड-१९विरुद्ध लसीकरण करून भारताने एक मोठा विक्रम केला असून हे सर्व संशोधानामुळेच शक्य झाले आहे. ज्यांना आज पदव्या पुरस्कार मिळणार आहेत ते सर्वजण भारताची गुंतवणूक आहेत. महत्वाकांक्षी आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीतील आपण सर्वजण प्रमुख खेळाडू आहात. तुमचे शोध, ज्ञान याचा जास्तीत जास्त फायदा समाजाला होईल यासाठी कार्यरत रहा. जेथे जाल तेथे उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन डॉ. साळुंखे यानी विद्यार्थ्यांना केले.
कुलगरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकाना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती दिली. आरोग्यसेवेत पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, अनुभव याचा उपयोग देशउभारणीसाठी करावा असे आवाहन केले.लोकमतचे संपादक वसंत भोसले म्हणाले, प्रसार माध्यमे आणि पोलिस यांच्याबद्दल लोक चांगले बोलत नाहीत, अशा परिस्थितीत या दोन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने डी. लिट दिली ही कृतज्ञता आहे. खळबळजनक बातम्या देण्याच्या प्रयत्नात माध्यमांवरचा विश्वास डळमळतो आहे. राजकीय नेते आणि माध्यमातील व्यक्तीपण याला कारणीभूत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मिडियाच्या तुलनेत गेल्या ३५ वर्षात मुद्रित माध्यमांनी जपलेली विश्वासार्हता अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुलांना कशापध्दतीने शिकवायचे याचे उदाहरण संजय आणि सतेज पाटील यांना त्यांच्या आईसाहेबांकडून मिळाले. माझ्या आईच्या पाठबळावर आम्हा भावंडांना शिकायला मिळाले. कोल्हापूरने मला खूप दिले. शाहूंच्या विचाराचा आज मी वाहक झालो, ते कोल्हापूरमुळे.जम्मू काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मला योग्य समजले गेले, हे मी माझे भाग्य समजते. विविध पदवी घेतलेल्या स्नातकांच्या यशात मी सहभागी झाले. हे सर्वजण भविष्यातील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील, त्याबद्दल मला आत्मविश्वास आहे.आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असे आवाहन शाहीदा परवीन गांगुली यांनी केले.डॉ वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, आज डी लीट ने सन्मानित केलेल्या शाहीदा परवीन गांगुली व ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले हे दोघेही रियल रोल मॉडेल आहेत. ज्यांचा हात डोक्यावर घ्यावा, किंवा ज्यांच्या पायावर डोके ठेवावे असे फार कमी लोक आहेत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान डी वाय पाटील विद्यापीठ करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे.

पन्हाळकर बाईंचा विशेष सत्कार
डॉ संजय डी पाटील आणि सतेज पाटील यांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा ज्या गणेश विद्यालयातून झाला. त्या विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका सुलभा पन्हाळकर बाई यांचा डी वाय पाटील ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सौ. शांतादेवी डी पाटील अर्थात आईसाहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सौ शांतादेवी डी पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील,वृषाली पृथ्वीराज पाटील, श्री मेघराज काकडे, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुचीत्राराणी राठोड, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्यासह गुपच्या विविध संस्थंचे प्राचार्य, विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५२० विद्यार्थ्याना पदवी
१५२ विद्यर्थ्याना एमबीबीएस, १४ जणांना पीएच.डी, २६ जणांना एमडी, १८ एम.एस., ८ विद्यार्थ्यांना फेलोशिप, ९३ बी.एस्सी नर्सिंग, २3 पोस्ट बेसिक नर्सिंग, १५ एमएससी नर्सिंग, 25 बी.एससी होस्पिटलिटी, 3 एम.एस्सी. स्टेम सेल, ११ एम.एस्सी. मेडीकल फिजिक्स, १० एम.एस्सी. मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, ९५ पीजीडीएमएलटी, २१ ओटी टेक्निशियन आणि ६ डायलेसीस टेक्निशियन पदवी व पदविका यावेळी प्रदान करण्यात आल्या.

१० जणांना सुवर्ण पदक   

 अंकुर जैन (एमबीबीएस), योगीता पाटील (बी.एस्सी नर्सिंग), उपासना कदम (पी.बी. बी.एस्सी नर्सिंग), रश्मी एन. एस. (एम.डी.), अश्विन लोकापूर (एम.एस.), विजयपाल कटला (एम.डी-मेडिसिन), सेजल राणे, दिया मोरे, रित्विक राय, या ९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. तर डॉ. नवनाथ शंकर पडळकर यांचा एक्सलन्स इन रिसर्च अवार्डने सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन डॉ देवव्रत हर्षे, डॉ निवेदिता पाटील यांनी केले.