Monday, April 15, 2024
Home ताज्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; ७ हजार ३१२ क्युसेक्स विसर्ग

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; ७ हजार ३१२ क्युसेक्स विसर्ग

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; ७ हजार ३१२ क्युसेक्स विसर्ग

कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राधानगरी धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा आज पहाटे ५.३० वाजता (दरवाजा क्रमांक ६) उघडला. सकाळी ८.५५ वाजता दरवाजा क्रमांक ५ उघडला. तसेच दुपारी २.२० वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ तर दुपारी ३.२० वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ४ उघडला. राधानगरी धरणाचे एकूण चार दरवाजे (क्रमांक ३,४,५,६) उघडले असून त्यातून एकूण ७ हजार ३१२ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील विसर्ग यामुळे जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन श्री. बांदिवडेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देणार त्या बूथप्रमुखाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार माजी आमदार सुरेश हाळवणकर

बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देणार त्या बूथप्रमुखाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार माजी आमदार सुरेश हाळवणकर   इचलकरंजी/प्रतिनिधी : भाजपाचे प्रदेश...

डॉ.संजय डी.पाटील यांचा ‘ऍग्री लिजंड अवॉर्ड’ने सन्मान

डॉ.संजय डी.पाटील यांचा 'ऍग्री लिजंड अवॉर्ड’ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे (कोल्हापूर) कुलपती...

खासदार धैर्यशील माने यांचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,जनसुराज्य शक्ती सक्रीय

खासदार धैर्यशील माने यांचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,जनसुराज्य शक्ती सक्रीय वारणानगर / प्रतिनिधी : कोडोली ता. पन्हाळा येथे खासदार धैर्यशील माने यानी केलेल्या...

डी वाय पाटील नर्सिंगला सर्वसाधारण विजेतेपद -डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविदयालयीन क्रीडा स्पर्धा

डी वाय पाटील नर्सिंगला सर्वसाधारण विजेतेपद -डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविदयालयीन क्रीडा स्पर्धा   कोल्हापूर/प्रतिनिधी : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धेत...

Recent Comments